आता भाजपा नेत्याचे नाना पटोलेंबाबत आक्षेपार्ह विधान; केली श्वानाशी तुलना

नाना पटोले यांच्या वक्त्यव्यावरून सध्या भाजपाची कॉंग्रेसवर टीका सुरु आहे.
political
political esakal

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Leader Nana Patole) यांनी 'मी मोदींना मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो' असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता भाजपाचे नेते आणि (BJP) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांच्या या वक्त्यव्यावरून सध्या भाजपाची कॉंग्रेसवर टीका सुरु आहे. दरम्यान कॉंग्रेस नेते नाना पटोले यांच्यावर टीका करत असताना भाजपाचे माजी आमदार अनिल बोंडे यांची जीभ घसरली आहे. त्यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे.

political
चोर, दरोडेखोर असा कलंक पुसायचाय

यात ते म्हणतात, नानाने तर हद्दच केली आहे. मी मालकीनचा सगळ्यात प्रमाणिक कुत्रा आहे हे दाखविण्यासाठी भुंकण्यासोबतच चावण्याचाही धमकी दिली आहे. पण त्यांनी लक्षात ठेवावं या महाराष्ट्रात शाहिस्ते खानाची फक्त नुसती बोटच छाटली होती, तुमचा पंजाच छाटलाच जाईल. राज्याचे युवक संतप्त झाले आहेत. अमरावतीवरून ते निघाले आहेत, त्यामुळ नानांनी पंजा सांभाळून ठेवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, नाना पटोले यांनी पंतप्रधानांविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे सध्या भाजप आक्रमक झाले आहे. पटोलेंच्या वक्तव्याबद्दल भाजप आक्रमक होताच पटोलेंनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली. मी गावगुंड मोदीबद्दल बोलत होतो. तो ग्रामस्थांना त्रास देत होता. त्यामुळे मी त्या मोदीबद्दल बोलत होते. मोदी नावाचे एकटेच व्यक्त नाहीत. माझं वक्तव्य खोडसाळपणे व्हायरल केलं जात आहे, असं पटोले म्हणाले.

political
राणेंना अटक करणारे पोलिस गप्प का?, पटोलेंविरोधात फडणवीस आक्रमक

भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पटोलेंनी मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच त्यांना अटक करण्याची मागणी केली. नारायण राणेंनी देखील पटोलेंवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पटोलेंचा समाचार घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com