
संतोष मद्दीवार, गडचिरोली: विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर 'कही खुशी, कही गम'चे वातावरण निर्माण झाले आहे. पराभूत उमेदवारांमध्ये कारणमिमांसा सुरु आहे. तसेच पुढील वाटचालीची दिशा ठरविण्याच्या आव्हानाबद्दल देखील विचारविमर्श सुरु झाले आहेत. युती सरकारमध्ये अजित पवार गटाची एन्ट्री भाजपमधील मोठ्या वर्गाला पचनी पडले नव्हते, एवढेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा उघडपणे विरोध दर्शविलेला होता. तेच अहेरी विधानसभा क्षेत्रातही घडले.