ग्रामपंचायत तरी तुमच्या ताब्यात आहे का? गिरीश महाजन यांचा खडसेंवर हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse-Girish Mahajan

ग्रामपंचायत तरी तुमच्या ताब्यात आहे का? महाजन यांचा खडसेंवर हल्लाबोल

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Jalgaon district bank election 2021) दिग्गज उमेदवार असतानाही पराभवाच्या भीतीने भाजपने (BJP) पळ काढला अशी टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (NCP Eknath Khadase) यांनी केली होती. त्यानंतर आता भाजप नेते गिरीश महाजन (BJP Girish Mahajan) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजप हा घाबरणारा पक्ष नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अजून जिल्हा परिषदेचे मैदान पुढे आहे, असं आव्हान महाजनांनी खडसेंना दिलं आहे.

हेही वाचा: परमबीर सिंह भारतातच, ४८ तासांत CBI समोर होणार हजर

एकनाथ खडसे यांनी आपला विधानसभा मतदारसंघ सांभाळावा. आपल्या गावातील ग्रामपंचायत तरी त्यांच्या ताब्यात आहे का? अशा शब्दात गिरीश महाजनांनी खडसेंवर टीका केली. तसेच जळगाव जिल्हा बँक निवडणूक काहीच नाही. अद्याप जिल्हा परिषदेचे मैदान समोर आहे. भाजप घाबरणारा पक्ष नाहीतर लढत देणारा पक्ष आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.

एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले होते? -

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत २१ पैकी एकवीस जागा महाविकास आघाडीच्या येणार असून आमचा अध्यक्ष होईल. या निवडणुकीत भाजपकडे दिग्गज उमेदवार होता. मात्र, त्यांना आपला पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याची भूमिका घेऊन पळ काढला आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले होते. मुक्ताईनगरमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

loading image
go to top