

BJP Inducts Kashinath Choudhary Once Alleged in Palghar Sadhus Killing Sparks Huge Debate
Esakal
राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असताना पालघरमध्ये साधूची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेवरून राज्यात भाजपनं महाविकास आघाडीविरोधात जोरदार मोहिम राबवली. त्यावेळी भाजपनं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्या नेत्यावर आरोप केले होते त्याच नेत्याला आता पक्षात घेतलंय. काशिनाथ चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह डहाणूत एका कार्यक्रमात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.