Bjp vs NCP : ''राष्ट्रवादीचे काम मोजक्याच जिल्ह्यात; अतिआत्मविश्वास चांगला नाही''

2024 मध्ये बारामतीमध्ये परिवर्तन होऊन भाजपचाच गुलाल उधळला जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
Gopichand Padalkar & Supria Sule
Gopichand Padalkar & Supria Sule Sakal

Gopichand Padalkar On Supria Sule : राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस एवढा देशभर पसरलेला नाही असे म्हणत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रीया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींसारख्या केंद्रीय नेतृत्त्वाचा परभाव होऊ शकतो तर राष्ट्रवादी पक्ष त्या तुलनेने खुपच छोटा असल्याचं पडळकर यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी 2024 मध्ये बारामतीमध्ये परिवर्तन होऊन भाजपचाच गुलाल उधळला जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

Gopichand Padalkar & Supria Sule
Viral Video : देसी आंटींचा 'जबरदस्त' डान्स, व्हिडिओ पाहून म्हणाल कुठे गेली ग्रॅव्हिटी

पडळकर म्हणाले की, काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादी पक्ष देशभर पसरलेला नाही. काही मोजक्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे काम चालते. त्यामुळे अति आत्मविश्वास चांगला नसल्याचा सल्लाही पडळकर यांनी सुप्रीया सुळे यांना दिला आहे.

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली असून, भाजपचं लक्ष यंदाच्या वेळी मिशन बारामती असल्याचं उघडपणे दिसून येऊ लागले आहे. येत्या 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण बारामतीत येणार आहे. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी बारामती येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल करत याआधी अनेक गड उद्धवस्त झाल्याचे सूचक व्यक्तव्य करत राष्ट्रवादचे सर्वेसर्वा शरद पवार यांना इशारा दिला.

Gopichand Padalkar & Supria Sule
Ganeshotsav: पुण्यातील मंडळांना विसर्जनापुर्वी धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

दरम्यान, निर्मला सीतारमण यांचा दौरा निश्चित झाल्यापासून सुप्रिया सुळेंचं मानसिक संतुलन बिघडलं असून, यामुळेच त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. बारामती लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जायचं कुठे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला असल्याचेही पडळकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com