Viral Video : देसी आंटींचा 'जबरदस्त' डान्स, व्हिडिओ पाहून म्हणाल कुठे गेली ग्रॅव्हिटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vial Video

Viral Video : देसी आंटींचा 'जबरदस्त' डान्स, व्हिडिओ पाहून म्हणाल कुठे गेली ग्रॅव्हिटी

Desi Aunties Dance : आपल्यापैकी अनेक जण या ना त्या कारणाने सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असतो. यादरम्यान अशा अनेक गोष्टी, व्हिडिओ बघण्यात येतात जे बराच काळ आपल्या आठवणीत राहतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, यामध्ये काही महिला डान्स करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातदेखील कुठे गेली ग्रॅव्हिटी असा प्रश्न नक्कीच उपस्थित राहिल.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये महिलांचा एक गट मजेशीर पद्धतीने नाचताना दिसत असून, ढोलच्या तालावर महिलांचे किलर एक्सप्रेशन आणि सुपर फास्ट डान्सच्या स्टेप्सने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. नेटिझन्सनी गमतीने या महिलांच्या डान्सला झिरो ग्रॅव्हिटी डान्स असे संबोधले आहे.

हेही वाचा: Eknath Shinde : मधल्या काळात बरंच काही घडू शकतं; शिंदेंच्या विधानानं सस्पेन्स आणखी वाढला

महिलांच्या या डान्सवर अनेक नेटिझन्सकडून मजेदार केमेंट्सदेखील दिल्या जात आहेत. त्यात अनेकांनी कुठे गेली ग्रॅव्हिटी असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर, काहींनी कमेंटमध्ये महिलांच्या डान्स स्टेप्सचे नाव विचारले आहे.

Web Title: Indian Women Superb Dance Viral On Social Media Everyone Must Watch

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..