esakal | भाजपनेच ‘राष्ट्रवादी’ला सत्तेसाठी विचारणा केली होती - शरद पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad-Pawar

‘ऑपरेशन कमळ’ म्हणजे सत्तेचा दुरुपयोग
भाजप नेते सुरुवातीला तीन महिन्यांत सरकार पाडायचा दावा करत होते. आता सहा महिन्यांत सरकार पाडू, असे म्हणत आहेत. भाजपचे ‘ऑपरेशन कमळ’ म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे. त्याचा महाराष्ट्रात काहीच फरक पडणार नाही, असेही पवार या वेळी म्हणाले.

भाजपनेच ‘राष्ट्रवादी’ला सत्तेसाठी विचारणा केली होती - शरद पवार

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत कधीच चर्चा केली नाही. याउलट भाजपनेच ‘राष्ट्रवादी’ला सत्तेसाठी विचारणा केली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलेल्या गौप्यस्फोटांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत पवार बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘राष्ट्रवादी’ने सत्तेसाठी भाजपसोबत कधीच चर्चा केली नाही. शिवसेनेला दूर ठेवून सरकार बनवू, असा प्रस्ताव भाजपनेच दिला होता, असा खुलासा शरद पवार यांनी केला. पवार म्हणाले की, शिवसेनेला बरोबर घ्यायचे नाही. तुम्ही आम्हाला स्थिर सरकार बनवायला 
साथ द्या, असे काही भाजप नेते आमच्याशी दोन ते तीन वेळा बोलले होते. 

Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा!

‘ऑपरेशन कमळ’ म्हणजे सत्तेचा दुरुपयोग
भाजप नेते सुरुवातीला तीन महिन्यांत सरकार पाडायचा दावा करत होते. आता सहा महिन्यांत सरकार पाडू, असे म्हणत आहेत. भाजपचे ‘ऑपरेशन कमळ’ म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे. त्याचा महाराष्ट्रात काहीच फरक पडणार नाही, असेही पवार या वेळी म्हणाले.

Edited By - Prashant patil