"आधे इधर जाओ, आधे इधर जाओ" ; भाजपने लाँच केला उद्धव ठाकरेंचा 'शोले' - BJP vs Uddhav Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP vs Uddhav Thackeray

BJP vs Uddhav Thackeray : "आधे इधर जाओ, आधे इधर जाओ" ; भाजपने लाँच केला उद्धव ठाकरेंचा 'शोले'

भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वाद उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बंड झाल्यानंतर भाजपने चांगलाच राजकीय फायदा घेतला. भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमपुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र हा राजकीय संघर्ष इथंच थांबला नाही. तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर देखील दावा सांगितला. निवडणूक आयोगाने शिंदे यांनी पक्षाचे नाव व चिन्ह दिले आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आपलं राजकीय अस्तित्व वाढवण्यासाठी मैदानात उतरले आहे. उद्धव ठाकरे संपूर्ण राज्यात शिवगर्जना अभियान घेणार आहेत. या शिवगर्जना अभियानाची भाजपने खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

शोले चित्रपटातील व्हिडिओ एडिट करत भाजपने टीका केली आहे. आधे इधर जाओ, आधे इधर जाओ बाकी मेरे पिछे ओवो, असा डायलॉग या व्हिडीओत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, भास्कर जाधव, अनिल परब यांचे चेहरे मॉर्फ केले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपने आपल्या अधिकृत फेसबूक पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्या कमेंट्स करत भाजपवर टीका केली आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, "भाजप महाराष्ट्रच्या वॉल वरून असले व्हिडीओ बनवून पोस्ट करणे, यावरूनच पक्षाची किती खालच्या दर्जाची बालिश मानसिकता आहे हे लक्षात येतं."

छान, पण ह्या शोले मध्ये चोर ,दरोडेखोर कोण आहे हे सर्वांना माहीत आहे, असो देव त्याना सद्बुद्धी देवो, असे देखील एका नेटकऱ्याने म्हटले आहे.