शोलेच नाही तर ‘या’ चित्रपटांनीही केले चित्रपटगृहात राज्य

चित्रपटगृहात राज्य करणारे हिंदी चित्रपट
Theaters News
Theaters NewsTheaters News

Theaters News अनेक दिवसांनी बॉलिवूडचा ब्रह्मास्त्र चित्रपट (Movie) बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करीत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. परंतु, याआधी प्रदर्शित झालेले बहुतांश हिंदी चित्रपट काही दिवसातच चित्रपटगृहातून उतरताना दिसले. त्यात आमिर खान व अक्षय कुमारसारख्या मोठ्या अभिनेत्यांच्या चित्रपटांचाही समावेश आहे. परंतु, बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट देखील बनले आहेत ज्यांनी प्रदर्शित झाल्यानंतर पडद्यावर जास्त काळ टिकण्याचा विक्रम केला आहे. चला तर जाणून घेऊ या अशा चित्रपटांबद्दल...

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (१९९५)

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट १९९५ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात शाहरुख खान आणि काजोलच्या केमिस्ट्रीने सर्वांची मने जिंकली होती. चित्रपटाची (Movie) कथा, गाणे आजही प्रेक्षकांना आवडतात. २७ वर्षांपासून हा चित्रपट आजही मुंबईतील मराठा मंदिर चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येतो. सकाळी साडेअकरा वाजता शो होतो.

Theaters News
Taapsee Pannu : आधी रिसर्च करा, मग प्रश्न करायला या; तापसी पन्नू पत्रकारावरच चिडली

शोले (१९९७)

रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला शोले हा चित्रपट आजही प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा खळबळ उडवून दिली होती. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीव कुमार, अमजद खान आणि जया बच्चन यासारख्या कलाकारांनी सजलेला हा चित्रपट चांगलाच गाजला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर २८६ आठवडे (पाच वर्षे) चित्रपटगृहात होता.

किस्मत (१९४३)

ज्ञान मुखर्जी दिग्दर्शित किस्मत चित्रपटाचे नावही या यादीत सामील आहे. या चित्रपटात अशोक कुमार, मुमताज शांती आणि शाह नवाज यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट १८६ आठवडे म्हणजे जवळपास तीन वर्षे चित्रपटगृहात टिकला.

Theaters News
टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमधील राधिका मदानचा बोल्ड लूक

मुघल-ए-आझम (१९६०)

मुघल-ए-आझम हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार आणि मधुबाला स्टारर चित्रपट जवळपास १५० आठवडे चित्रपटगृहात सुरू होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com