BMC Election: मुंबई मनपा निवडणुकीसाठी भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये; पदाधिकाऱ्यांना मिळणार डच्चू

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून तयारी सुरू
devendra fadnavis
devendra fadnavisesakal

राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच भाजपने आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपकडून कंबर कसून तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून मिशन 150 ची योजना आखण्यात आली आहे. मिशनच्या अंमलबजावणीसाठी पक्षाच्यावतीने जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.

सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. अशातच गेल्या काही दिवसात केंद्रीय मंत्र्यांचे वाढलेले दौरे आणि हालचाली यामुळे भाजप आगामी निवडणुकीसाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

devendra fadnavis
Sharad Pawar VS Prithviraj Chavan: 'तुमची कॅटेगरी काय...?', शरद पवारांचा पृथ्वीराज चव्हाणांना खोचक सवाल

पक्षाच्या नियोजनानुसार मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरात आढावा घेऊन अनेक पदांची खांदेपालट होण्याच्या चर्चा सुरू आहेत. पक्षाला गरज वाटल्यास अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना डच्चू देण्यात येणार आहे. तर वॉर्ड व जिल्हा अध्यक्षही बदलण्यात येणार आहेत.

राज्याच्या प्रदेश कार्यकारिणी प्रमाणेच मुंबई कार्यकारिणीत देखील महिनाभरात मोठे बदल होणाची चिन्हे दिसून येत आहेत. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपच्याकडून व्यवस्थित नियोजन सुरू आहे.

devendra fadnavis
Sharad Pawar: पुन्हा अध्यक्षपदी पवारच! रयतमध्ये त्यांच्या विरोधात कोणाचाच अर्ज नाही

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या महापालिकेत गेले अनेक वर्ष शिवसेनेची एकहाती सत्ता होती. मात्र आता शिवसेनेत फूट पडून दोन वेगवेगळे गट निर्माण झाल्यामुळे शिवसेना शिंदे गटासोबत युती करून ही महापालिका निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून देखील पुन्हा महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ही निवडणूक अतितटीची असणार आहे.

devendra fadnavis
Accident News: मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक आणि ST बसचा भीषण अपघात; 18 जखमी, एक प्रवासी गंभीर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com