esakal | आशिष शेलार मुख्यमंत्र्यांना म्हणतात, 'तुझ्या बापाचं राज्य आहे का?'
sakal

बोलून बातमी शोधा

BJP leader Ashish Shelar criticized on CM Uddhav Thackeray

“हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?”, असा घणाघात शेलारांनी केला.

आशिष शेलार मुख्यमंत्र्यांना म्हणतात, 'तुझ्या बापाचं राज्य आहे का?'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : “नागरिकत्व दुरुस्ती कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही”, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यांच्या याच विधानावर भाजप नेते आणि माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरत टीका केली.

पवार, ठाकरेंच्या फोन टॅपिंग चौकशीसाठी समितीची स्थापना

“हा कायदा केंद्राचा आहे. कायदा लागू होऊ देणार नाही म्हणजे अरे तुझ्या बापाचे राज्य आहे का?”, असा घणाघात शेलारांनी केला. मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना यावेळी शेलारांची जीभ घसरली. सध्या सीएए व एनआरसीबाबत सबंध देशात असंतोषांचे वातावरण असून सर्वच स्तरांतून या कायद्याला विरोध होत आहे. यावरच संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणाले की, एनआरसीचा कायदा महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही. यावरच प्रतिक्रिया देताना शेलारांनी ठाकरेंवर टीका केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एनआरसीबाबत राज्य सरकारचा निर्णय ग्राह्य धरला जात नसून, सर्वच राज्यांना केंद्राचा निर्णय स्विकारावा लागणार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे याबाबतचा निर्णय घेऊ शकत नाहीत, असे शेलार यांनी सांगितले.