esakal | आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही; चंद्रकांत पाटील यांचा टोला (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. महायुतीचे प्रमुख घटक पक्ष भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपद आणि खाते वाटपावरून सध्या वाद सुरू आहे. हा वाद इतका टोकाला गेला आहे की, एकमेकांचे आमदार पळवण्याची भीतीही वाटू लागली आहे. यासगळ्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही; चंद्रकांत पाटील यांचा टोला (व्हिडिओ)

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. महायुतीचे प्रमुख घटक पक्ष भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपद आणि खाते वाटपावरून सध्या वाद सुरू आहे. हा वाद इतका टोकाला गेला आहे की, एकमेकांचे आमदार पळवण्याची भीतीही वाटू लागली आहे. यासगळ्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबईतील नवीन उत्तम लोकलबद्दल 'या' आहेत मुंबईकरांच्या प्रतिक्रिया

माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'आम्ही कोणाचे आमदार फोडत नाही. आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही. गेल्या पाच-दहा वर्षांत भारतीय जनता पक्षात जे कोणी लोक आले ते भाजपची कार्यपद्धतीन पाहून विकासाची दृष्टी पाहून आले आहेत. आम्ही कोणालाही कोणतेही आमीष दाखवले नाही कोणालाही ईडीची धमकी दिलेली नाही.' लोकांनी विधानसभा निवडणुकीत पूर्ण जनादेश किंबहुना स्पष्ट जनादेश देऊनही सरकार स्थापनेला विलंब होत आहे. जनतेसाठीही धक्कादायक बाब आहे. यातून लवकरात लवकर काही तरी मार्ग काढावा लागले, असे मतही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार

विठ्ठल चरणी प्रार्थना
चंद्रकांत पाटील म्हणाले, 'महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात निसर्गाचं चक्र बदललं आहे. गेल्या 100 वर्षांत झाला नाही तेवढा परतीचा पाऊस झाला, तेवढचा महापूर आपण पाहिला. भारत हा ऋतू समतोल देश ओळखला जातो पण, यंदा आपल्याला निसर्गाचं रौद्र रूप पहायला मिळालं. आता ज्या काही चुका झाल्या त्या, त्यातून आम्हाला सावरण्याची शक्ती दे, अशी माझी विठ्ठल चरणी प्रार्थना आहे.'

loading image