Ajit Pawar: अजित पवारांच्या भाजप प्रवेशांच्या चर्चेवर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

या चर्चा सुरू असतानाच बावनकुळे दिल्लीला पोहोचल्यानं चर्चेला उधाण आलं
Ajit Pawar Vs Chandrashekhar Bawankule
Ajit Pawar Vs Chandrashekhar BawankuleEsakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. आज अजित पवार यांनी आपले सासवडमधील सर्व कार्यक्रम अचानक रद्द केले त्यानंतरही चर्चेला उधाण आलं. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार हे मोठे नेते दिल्लीला पोहोचल्यामुळे तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान आता यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'भाजपच्या विचारधारेनुसार काम करणार असेल तर पक्षात कोणीही आलं तरी हरकत नाही. भाजपमध्ये सर्वांसाठी स्थान आहे. आमच्याकडे देश, देव, धर्माला मानणारे आले तर त्यांचं स्वागतच आहे. आमच्याकडे विचारधारेवर काम करावं लागतं' असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

बावनकुळे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता त्यांनी अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आहे का? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे.

Ajit Pawar Vs Chandrashekhar Bawankule
Ajit Pawar: चंद्रशेखर बावनकुळे तडकाफडकी दिल्लीला! या दिल्लीवारीचं कनेक्शन अजितदादांशी?

राज्यात घडामोडींना वेग

राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, तर दुसरीकडे भाजपचे दोन मोठे नेते तडकाफडकी दिल्लीला रवाना झाले आहेत.

Ajit Pawar Vs Chandrashekhar Bawankule
Ajit Pawar: अजित पवारांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे दिवसभरातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. अजित पवार यांचा आज पुणे दौरा ठरला होता, परंतु ते अद्याप मुंबईतच आहे, अशी माहिती आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये आहे. अजित पवार यांचे अचानक सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Ajit Pawar Vs Chandrashekhar Bawankule
Ajit Pawar: 'अजित पवारांसारखं कोणी येत असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करू', शिंदे गटाच्या नेत्याचं वक्तव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com