हिम्मत असेल तर विधानसभा विसर्जित करून निवडणुका घ्या, भाजप नेत्याचं आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CT RAVI

हिम्मत असेल तर विधानसभा विसर्जित करून निवडणुका घ्या, भाजप नेत्याचं आव्हान

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पार्ट टाईम मुख्यमंत्री आहेत. राज्याला देवेंद्र फडणवीसांसारखा (Devendra Fadnavis) फुलटाईम मुख्यमंत्री हवाय. हिंम्मत असेल तर विधानसभा विसर्जित करा आणि पुन्हा निवडणुका घ्या. कोण जिंकेल ते कळेलच, असं आव्हान भाजपचे प्रदेश प्रभारी सी. टी. रवी यांनी दिले आहे. तसेच त्यांनी शिवसेनेवर देखील टीका केली आहे.

हेही वाचा: स्त्री-पुरुषांना एकमेकांकडून मसाज करून घेता येणार नाही; पार्लरसाठी नवे नियम

राज्यातील मुख्यमंत्री किती वाजता उठतात काय करतात हे जनतेला माहिती आहे. हिंदूत्व सोडून आता शिवसेना परिवार पार्टी झाली आहे. जनतेने नरेंद्र मोदी आणि फडणवीसांमुळे २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेला मत दिले आहे. शिवसेनेने भाजपला धोका नाहीतर जनतेला धोका दिला आहे. दुसऱ्या पक्षासोबत सरकार बनवून जनतेला धोका दिला आहे. शिवसेना फक्त परिवार वाढविण्याचे काम करत आहे, असा घणाघाती आरोप देखील रवी यांनी केला आहे.

शिवसेनेचे प्रत्युत्तर -

सीटी रवी यांचं भाषण अतिशय भंपकपणाचं होतं. यांना लोक हसतील. राजकारणाचा कुठलाही काही संबंध आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. पार्ट टाईम आणि फुल टाईम मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीत असेल. अशी संकल्पना देशात कुठेही नाही, असं प्रत्युत्तर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी दिलं.

प्रत्येकवेळी यांचा शिवसेनेवर राग का? प्रत्येकवेळी भाजपने सेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. भाजपला प्रत्येकवेळी मुख्यमंत्री पद हवं आहे. हिंदूहृदयसम्राटांचा हात पकडून हे राजकारणात आले. मग कसल्या धोकाधडीच्या गोष्ट करतात. कुठल्या तोंडाने महाराष्ट्रात येतात? तुम्ही युती होण्यापूर्वीच्या गोष्टी पाळल्या नाहीत. मग शिवसेना तुमच्यामागे धावणार आहे का? असा सवाल देखील कायंदे यांनी यावेळी उपस्थित केला.

loading image
go to top