भाजपच्या बैठकीला एकनाथ खडसेच गैरहजर; पाहा काय घडले!

टीम ई-सकाळ
Saturday, 7 December 2019

मुंबई : जळगावात आज, भाजपची विभागवार आढावा बैठक सुरू आहे. पण, एकनाथ खडसे यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेच बैठकीला गैरहजर राहिल्यामुळं त्याच्या नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. भाजपमध्ये नेत्यांचा एक गट नाराज आहे. त्यांचं नेतृत्व एकनाथ खडसे करत असल्याचं बोललं जातंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

मुंबई : जळगावात आज, भाजपची विभागवार आढावा बैठक सुरू आहे. पण, एकनाथ खडसे यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेच बैठकीला गैरहजर राहिल्यामुळं त्याच्या नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. भाजपमध्ये नेत्यांचा एक गट नाराज आहे. त्यांचं नेतृत्व एकनाथ खडसे करत असल्याचं बोललं जातंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

एकनाथ खडसे आहेत कुठे?
भाजप सध्या राज्यात विभागवार आढावा बैठका घेत आहे. त्यात विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या मतदारसंघातील कारणांचा राजकीय समीकरणांचा आढावा घेण्याचं काम सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या आढावा बैठका सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्राची धुरा असलेले गिरीष महाजन तसेच राधाकृष्ण विखे-पाटील आदी प्रमुख नेते उपस्थित होते. पण, एकनाथ खडसेच जळगावच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं भाजपच्या गोटात नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या अनुपस्थितीबद्दल भाजपमधून कोणतिही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही तसेच, एकनाथ खडसे यांच्या बाजूनेही कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पण, एकनाथ खडसे यांची नाराजी कायम असल्याची चर्चा आहे. 

आणखी वाचा - 'काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावामुळेच प्रकल्पांना स्थगिती'

आणखी वाचा - सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच मोदी-ठाकरे भेट

नाराजी कशामुळे?
एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. तत्पूर्वी, एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारण्यात आलं. शेवटच्या टप्प्यात रोहिणी खडसे यांना तिकीट देण्यात आलं. पण, निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. या पराभवाला भाजपमधील ज्येष्ठ नेतेच कारणीभूत असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. खडसे यांनी पंकजा मुंडे यांच्या पराभवालाही भाजपमधील अंतर्गत राजकारण जबाबदार असल्याची टीका केली होती. खडसे यांच्यासह पंकजा मुंडेही नाराज असल्याची चर्चा होती. पण, त्यांनी मीडियाशी बोलताना अशी कोणतिही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं होतं. भाजपने विधानसभेत तिकीट नाकारलेले विनोद तावडे, राम शिंदे हे नेतेही पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी खडसे आणि पंकजा मुंडे यांची भेट झाली होती. त्यामुळं ही नाराजी अधोरेखीत झाल्याचं बोललं जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader eknath khadse absent for parties regional meeting in jalgaon