esakal | एकनाथ खडसे पवारांच्या भेटीला; वेगळी भूमिका घेणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Bjp Leader Eknath Khadse Meets Ncp Chief Sharad Pawar At Delhi Residence

भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी पोहोचले आहेत. मागच्या आठवड्यात मला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा खडसेंनी दिल्यावर ते पवारांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आले असून खडसे खरोखरच वेगळी भूमिका घेणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ खडसे पवारांच्या भेटीला; वेगळी भूमिका घेणार?

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी पोहोचले आहेत. मागच्या आठवड्यात मला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा खडसेंनी दिल्यावर ते पवारांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आले असून खडसे खरोखरच वेगळी भूमिका घेणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा, ई-सकाळचे ऍप   

खडसे भाजपमध्ये नाराज असून वेळोवेळी त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. खडसे हे भाजप नेत्यांच्या भेटीसाठी दिल्लीत गेल्याची चर्चा होती. पण, त्याऐवजी ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. भाजपमध्ये बहुजन समाजाला डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कोणी पक्षविरोधात कामे केलेल्यांची नावे आपण वरिष्ठांकडे दिली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

अजित पवार म्हणतात एकमत होत नसेल तर सर्वांनी राजीनामे द्या 

पक्षाच्या निर्णय प्रक्रियेपासून मला जाणीवपूर्वक दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. माझा पक्ष सोडण्याचा अद्यापही विचार नाही. परंतु, असेच चालू राहिले तर मला वेगळा विचार करावाच लागेल असा इशारा त्यांनी भाजपला दिला होता. पक्ष उभारणीसाठी मी मेहनत घेतली. परंतु, आता महत्वाच्या काळात पक्ष सोबत नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखविली होती.