Vidhan Sabha 2019 : एकनाथ खडसे उद्या घेणार महत्त्वाचा निर्णय?

टीम ई-सकाळ
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

एकनाथ खडसे समर्थक आणि त्यांच्या गोटातील नेते, कार्यकर्ते उद्या (शुक्रवार) 11 वाजता जमणार आहेत. त्यानंतरच आता खडसे आपली पुढील भूमिका काय असेल हे स्पष्ट करणार आहे.  

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. आत्तापर्यंत 3 याद्या जाहीर करण्यात आल्या. मात्र, यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे आता एकनाथ खडसे हे आता उद्या (शुक्रवार) आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळत आहे.

महसूलमंत्रिपद भूषविलेले आणि राज्यातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक नाव प्रामुख्याने घेतले जाणाऱ्या एकनाथ खडसे यांना अद्याप उमेदवारी मिळाली नाही. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज यापूर्वीच दाखल केला. भाजपकडून आत्तापर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता तिसरी यादीही जाहीर झाली. मात्र, यामध्येही त्यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे आता एकनाथ खडसे चांगलेच नाराज आहेत. या नाराजीतूनच ते आता उद्या काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.

Vidhan Sabha 2019 : मावळमध्ये भाजपला दणका; भाजपनेत्याला राष्ट्रवादीची उमेदवारी

11 वाजता कार्यकर्ते जमणार

एकनाथ खडसे समर्थक आणि त्यांच्या गोटातील नेते, कार्यकर्ते उद्या (शुक्रवार) 11 वाजता जमणार आहेत. त्यानंतरच आता खडसे आपली पुढील भूमिका काय असेल हे स्पष्ट करणार आहे.  

Vidhan Sabha 2019 : मेगाभरती ते ‘मेगानाराजी’; युतीतील चित्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eknath khadse will announce his future political plan on Tomorrow Maharashtra Vidhan Sabha 2019