किरीट सोमय्या कऱ्हाडातून मुश्रीफांवर डागणार तोफ

Kirit Somaiya-Hassan Mushrif
Kirit Somaiya-Hassan Mushrifesakal
Updated on

सातारा : भाजपा नेते किरीट सोमय्या (BJP leader kirit somaiya) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधल्यानंतर त्यांनी हसन मुश्रीफांना (Hasan Mushrif) 'टार्गेट' करण्यास सुरुवात केलीय. सोमय्यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या त्यांच्या आरोपामुळे कोल्हापूरसह राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हा बंदी करण्यात आलीय, पण सोमय्या कोल्हापूरला येण्यावर ठाम आहेत. काल (ता. 19) मुंबईत पोलिसांनी ४ तास त्यांना स्थानबध्द केल्याचा दावा केलाय. आज (ता. 20) पहाटे साडेचारच्या सुमारास भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी कऱ्हाडात ताब्यात घेतलं असून कोल्हापूर व सातारा पोलिसांनी (Kolhapur and Satara Police) संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. मुंबईवरुन किरीट सोमय्या कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले असता, त्यांना मुंबईपासून पोलिसांनी फाॅलोअप केला होतं. येथील शासकीय विश्रामगृहात ते थांबले असून सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन मुंबईला रवाना होणार आहेत.

Summary

सोमय्यांनी मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. या त्यांच्या आरोपामुळे कोल्हापूरसह राज्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालंय.

किरीट सोमय्यांना कोल्हापुरात नो एन्ट्री

मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या आज 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार आहेत. मात्र, सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास सक्त मनाई करण्यात आलीय. या नोटिशीनंतर माझ्या कोल्हापूरच्या दौऱ्यात ठाकरे सरकारकडून खोडा घातला जात असल्याचा आरोप खुद्द सोमय्या यांनी केलाय. दरम्यान, सोमय्या हे मुंबईवरुन महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना झाले, असले तरी कोल्हापुरात त्यांना प्रवेश मिळणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.

मला तुम्ही अडवू शकत नाही, सोमय्यांचा पोलिसांना 'दम'

काल (ता. 19) मुंबईतील CSMT स्थानकावर पोलीस आणि सोमय्या यांच्यात बराचवेळ राडा झाला. रेल्वेस्थानकावर पोलिसांचा मोठ्याप्रमाणावर फौजफाटा होता. ज्यांनी किरीट सोमय्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोमय्यांनी आक्रमक भूमिका घेत, पोलिसांना तुम्ही मला अडवू शकत नाहीत, माझ्यावरील कारवाई बेकायदेशीर आहे, असं म्हणत कोल्हापूरला जाणारचं, यावर ते शेवटपर्यंत ठामच राहिले. यानंतर बराचवेळ सोमय्या हे पोलिसांच्या गराड्यातच अडकले होते. याप्रकारानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच निशाणा साधला. त्यांनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना थेट आवाहन देत, मी कोल्हापुरात येतोय मला रोखून दाखवा, असं चॅलेंज केलंय.

Kirit Somaiya
Kirit Somaiya
Kirit Somaiya-Hassan Mushrif
मुंबई पोलिसांनंतर किरीट सोमय्यांना कऱ्हाड पोलिसांनी घेतलं ताब्यात

किरीट सोमय्यांच्या पाठिशी भाजप ठाम : चंद्रकांत पाटील

ठाकरे सरकार बळाचा वापर करून भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय, पण ही दडपशाही चालणार नाही. भाजप पूर्ण ताकदीने सोमय्या यांच्या पाठीशी असून त्यांचा आवाज दडपता येणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी दिला. माजी खासदार किरीट सोमय्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रकरणं बाहेर काढत असताना त्यांना कोल्हापूरला जाण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करतंय. त्यांच्यावर दबाव टाकला जातोय, त्यांना पोलिसी खाक्या दाखवला जातो, हे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी केलाय.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांनी शेकडो कोटींचा घोटाळा केला : किरीट सोमय्या

भाजप नेते किरीट सोमय्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. यासंदर्भात सर्व पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केलाय. मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपनी असून या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल कंपन्यांसोबत व्यवहार झाल्याचे अनेक कागदपत्र आपल्याकडे आहेत. नाविद मुश्रीफ यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढत असताना, या कंपन्यांशी व्यवहार झाल्याचंही कागदपत्रांतून दिसून येतेय. हसन मुश्रीफ आणि कुटुंबीयांनी मनी लॉन्ड्रिंग, बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. तर, मुश्रीफांनी सीआरएम सिस्टम या कंपनीकडून 2 कोटींचे तर मरुभूमी फायनान्स कंपनीकडून 3.85 कोटींचे कर्ज घेतलं असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.

Kirit Somaiya-Hassan Mushrif
NCP महिला जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस; कोणाला मिळणार संधी!

जरंडेश्वर कारखान्यावरुन अजित पवारांना 'चॅलेंज'

अजित पवारांमध्ये हिम्मत असेल, तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत, असा सवाल किरीट सोमय्यांनी केलाय. 65 कोटीत कारखाना घेतला अन् 700 कोटीचं बँकेचं कर्ज घेतलंय. जरंडेश्वरच्या एका व्हॅल्यूअरचं नाव वैभव शिंदे आहे, असंही त्यांनी पवारांवर निशाणा साधताना नमूद केलंय.

अजित पवार-जरंडेश्वर कारखान्याचं काय कनेक्शन?

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा प्रथम मेसर्स गुरू कमोडिटी प्रा. लि., कंपनीने विकत घेतला होता. मात्र, ही गुरू कमोडिटी कंपनी बनावट असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आलाय. जरंडेश्वर शुगर मिलने पुणे जिल्हा बँकेकडून सुमारे 700 कोटीचं कर्ज घेतलंय. गुरु कमोडिटीजनं 2010 मध्ये 65 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केला होता. हा जरंडेश्वर कारखाना सध्या मेसर्स गुरू कमोडिटी सर्व्हिसेस यांच्या मालकीचा आहे. ह्या कारखान्याला मेसर्स जरंडेश्वर शुगर मिल प्रा. लिमिटेडला भाड्याने देण्यात आलंय. ईडीने केलेल्या तपासात मेसर्स स्पार्कलिंग कंपनी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे. अजित पवारांच्या म्हणण्यानुसार, हायकोर्टाच्या आदेशानं या कारखान्याचा लिलाव करण्यात आला आहे, असं नमूद केलं गेलंय.

Kirit Somaiya-Hassan Mushrif
भाजप आमदाराची साथ सोडताच, वाईकरांना मिळालं NCP चं 'अध्यक्षपद'

अजित पवारांच्या नातेवाईकांचा कारखाना ईडीकडून जप्त

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं मोठी कारवाई केलीय. या प्रकरणात ईडीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केलाय. ईडीची ही कारवाई अजित पवारांसाठी मोठा धक्का होता. हा कारखाना राजेंद्र कुमार घाडगे यांच्या मालकीचा असून घाडगे हे अजित पवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा तपास सुरू असताना जरंडेश्वर कारखान्याने बँकेकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याचं स्पष्ट झालं. यावरुनच ईडीनं आता कारखान्यावर जप्तीची कारवाई केलीय.

सातारा जिल्हा बँकेलाही ईडीची नोटीस

जरंडेश्वर कारखान्यावर सक्तवसुली संचालनालयाने जप्तीची कारवाई केल्यानंतर या कारखान्याला कर्ज दिलेल्या सातारा जिल्हा बँकेलाही ईडीने नोटीस बजावली होती. यामध्ये कर्ज पुरवठा कशाच्या आधारावर केला आहे, त्याची परतफेड नियमित होतेय का?, याची माहिती ईडीने मागितली होती. कारखान्याकडून सक्षम तारणावरच कर्जपुरवठा केला असून त्यांचे कर्ज परतफेडीचे हप्ते वेळेवर येत असल्याने आम्ही ईडीच्या नोटिशीला सक्षमपणे उत्तर देऊ, असं जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur rural police action
Dattatray Bharne
Vishrantwadi company cash theft
सायबर पोलिस
Marathi News Esakal
www.esakal.com