Sachin-Sawant
Sachin-Sawant

बॅंकांना बुडविण्यात भाजपचे नेते आघाडीवर - सचिन सावंत

मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना बुडविण्यात भाजपचे नेते आघाडीवर आहेत. या यादीत आता मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय (कंबोज) यांचेही नाव आले आहे. भाजप सरकारच्या पाठबळामुळेच बॅंकांना लुटण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

ते म्हणाले, की बॅंकांचा म्हणजेच जनतेचा पैसा लुबाडण्याचे प्रकार भाजप सरकारच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, हे रिझर्व्ह बॅंकेनेही स्पष्ट केले आहे. यात भाजप नेत्यांचा सहभाग उघड झाला आहे. याआधी भाजपच्या खासदार पूनम महाजन या ‘विलफुल डिफॉल्टर’ असल्याचे उघड झाले आहे. कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही वनटाइम सेटलमेंटचा फायदा घेऊन बॅंकांना बुडविले. यातही भाजप सरकारची छत्रछाया त्यांच्या कामी आली. आता कंबोज यांनीही बॅंक ऑफ बडोदाला बुडविले आहे. 

मोहित हे हेतुपुरस्सर कसुरदार थकबाकीदार (विलफुल डिफॉल्टर) असल्याची जाहिरात बॅंक ऑफ बडोदाने वर्तमानपत्रात दिली आहे. अशा सर्व थकबाकीदारांवर कठोर कारवाई करून जनतेचा पैसा पुन्हा बॅंकेत परत आला पाहिजे, यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत, अशी मागणी सावंत यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com