esakal | मला कुणालाही संपवून नेता व्हायचं नाही- पंकजा मुंडे
sakal

बोलून बातमी शोधा

pankaja munde bhagwat karad

मंत्रिपद प्रीतम मुंडे यांना न मिळता भागवत कराड यांना मिळाल्याने पंकडा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरु होती. यावर पंकजा मुंडे यांनी खुलासा केला आहे

मला कुणालाही संपवून नेता व्हायचं नाही- पंकजा मुंडे

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

मुंबई- मंत्रिपद प्रीतम मुंडे यांना न मिळता भागवत कराड यांना मिळाल्याने पंकडा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरु होती. यावर पंकजा मुंडे यांनी खुलासा केला आहे.''प्रीतम मुंडे लायक असताना त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. डॉक्टर कराड यांना मंत्रिपद मिळालं. माझ वय आज 42 आहे, कराड यांचं वय 65 आहे. एका 65 वर्षाच्या आपल्या समाजाच्या माणसाचा अपमान करण्याचे माझ्यावर संस्कार नाहीत. मी त्यांचा पदाला अपमानीत करणार नाहीत. कुणाला काही मिळाले असेल तर मला आनंद आहे. मला संधी मिळाली असती तर मी त्यांच्या शपथविधीलाही गेले असते. त्यामुळे मला कसलंही दु:ख नाही'', असं म्हणत पंकजा यांनी भागवत कराड यांच्या मंत्रिपदाबाबत भाष्य केलं.

मी काल दिल्लीत गेल्याने विविध चर्चांना उत आला. पण, काहींनी बातमी दिली की, पंतप्रधान मोदींनी मला झापलं. मी पंतप्रधान मोदी यांची संघटना बांधणीसंबंधी चर्चेसाठी भेट घेतली होती. त्यांनी चांगली वागणूक दिली. चांगल्या वातावरणात भेट झाली. जे पी नड्डा यांनी तुम्ही समर्थकांची समजूत काढाल असा विश्वास व्यक्त केला होता. त्यामुळे मी दबावतंत्रासाठी दिल्लीत गेले हे म्हणणं साफ चुकीचं आहे. दबावतंत्र वापरणं मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत. पक्षानं दिलेलं मी लक्षात ठेवते आणि कार्यकर्तेही लक्षात ठेवतात. आपली एकजूट कमी करण्याचा डाव यशस्वी होऊ देऊ नका. मोठा नेता नेहमी त्याग करतो, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

हेही वाचा: कौरव-पांडव अन् धर्मयुद्ध; पंकजा मुंडेंच्या मनातील 'महाभारत'

मुंडे साहेबांनी आयुष्यभर खस्ता खाऊन वंचितांना आवाज देण्यासाठी काम केलं. समाजातील तळागाळातील माणूस राजकारणात यायला पाहिजे, लोकप्रतिनिधी झाला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी सर्वसामान्यांना मंच उपलब्ध करुन दिला. आपल्या हाडामासाचा माणूस लोकांमध्ये उतरला पाहिजे, लोकांमध्ये राहून काम केलं पाहिजे, त्यामुळे त्यांनी मला राजकारणात आणलं. त्यामुळे माझ्या राजकारणाचा पाया मला मंत्री करा, बहिणीला मंत्री करा, नवऱ्याला मंत्री करा असा नाही. माझा परिवार महाराष्ट्रात मुंडे साहेबांवर प्रेम करणारा निष्पाप कार्यकर्ता आहे. माझ्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी राजकारणात आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

loading image