Adipurush: भावना दुखावल्यामुळे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; भाजपच्या नेत्याने घेतली ठाम भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ram Kadam News

Adipurush: भावना दुखावल्यामुळे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; भाजपच्या नेत्याने घेतली ठाम भूमिका

मुंबईः आदिपुरुष या चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यानंतर त्यातील पात्रांवरुन सोशल मीडियात तुफान घमासान झालं. या चित्रपटामध्ये हिंदू देवदेवतांचा अवमान झाल्याचा आरोप होतोय.

आदिपुरुष या चित्रपटामध्ये रावणाची भूमिका साकारलेल्या सैफ अली खानला टीकेला सामोरं जावं लागलं. त्याचा लूक अतिरंजित आणि पात्राशी साजेसा नव्हता, असा आक्षेप आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी आदिपुरुष चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका कदमांनी घेतलीय. या चित्रपटात देवदेवतांचं विडंबन केल्याचं त्यांनी ट्विटमधून सांगितलं.

हेही वाचा: Pune Crime: पुणे विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई, वर्षभरात जप्त झाले कोट्यवधीचे सोने

'आदिपुरुष हा चित्रपट महाराष्ट्राच्या भूमित प्रदर्शित होऊ देणार नाही. चुकीच्या पद्धतीने प्रसिद्धी मिळवण्यासाठी देवीदेवतांचं विडंबन करुन हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागावी' असं ट्विट राम कदम यांनी केलं आहे.

केवळ आक्षेपार्ह दृष्यांवर निर्बंध आणून चालणार नाही. तर या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे, ज्यांनी असा उद्योग केलाय त्यांना इंडस्ट्रीमध्ये बॅन केलं पाहिजे, असंही कदम म्हणाले.

टॅग्स :BjpRam Kadamsaif ali khan