

Political Controversy Maharashtra eknath shindedevendra fadanvis
esakal
BJP News Maharashtra : मनोज जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपवरून महायुतीत आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ‘एकनाथ शिंदेंची भीती कशाला वाटेल, शिंदे आमचे मित्र आहेत. पुढेही राहतील,’ असे स्पष्ट करत त्यांनी महायुतीतील नेत्यांना एकमेकांवर आरोप करणारी विधाने टाळण्याचा सल्ला दिला. तसेच, अशा कथित ऑडिओ क्लिपकडे लक्ष देऊ नये, असेही त्यांनी म्हटले.