esakal | सर्वधर्मसमभाव आघाडीला आमच्या शुभेच्छा : मुनगंटीवार
sakal

बोलून बातमी शोधा

sudhir-mungantiwar

आज (सोमवार) सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत भाजपची वेट अँड वॉचची भूमिका आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सर्वधर्मसमभाव आघाडीला आमच्या शुभेच्छा आहेत, अशी खोचक टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

सर्वधर्मसमभाव आघाडीला आमच्या शुभेच्छा : मुनगंटीवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आज (सोमवार) सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत भाजपची वेट अँड वॉचची भूमिका आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या सर्वधर्मसमभाव आघाडीला आमच्या शुभेच्छा आहेत, अशी खोचक टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने असमर्थता दर्शविल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांना आज (ता. ११) सोमवार सायंकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ राज्यपालांनी दिला असून, तोपर्यंत सत्ता स्थापन करू शकणार का, हे शिवसेनेला राज्यपालांना कळवावे लागणार आहे. त्यापूर्वी आज दुपारी भाजपच्या कोअर समितीची बैठक होत आहे. भाजपने सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या बैठकीपूर्वी मुनगंटीवार म्हणाले, की शिवसेनेला आमच्याशी चर्चा करायची नाही. पण, त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी बोलायचे आहे. सायंकाळ साडेसातपर्यंत आम्ही वाट पाहू. त्यानंतर भूमिका स्पष्ट करू. तोपर्यंत आमची वेट अँड वॉचची भूमिका आहे.

शिवसेना 'एनडीए'तून बाहेर?; अरविंद सावंत यांचा राजीनामा

रास्ते की परवाह करूँगा तो... : संजय राऊत