esakal | "खुर्चीला मिठी ,कारण कायद्याची  भीती"; भाजपची महाविकास आघाडीवर टीका
sakal

बोलून बातमी शोधा

"खुर्चीला मिठी ,कारण कायद्याची  भीती"; भाजपची महाविकास आघाडीवर टीका

महाराष्ट्रातील तिन्ही पक्ष केवळ  निरुपायाने एकत्र!

"खुर्चीला मिठी ,कारण कायद्याची  भीती"; भाजपची महाविकास आघाडीवर टीका

sakal_logo
By
संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली :  "खुर्चीला मिठी ,कारण कायद्याची  भीती" असे सध्याच्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे सूत्र आहे . त्यांच्या एकत्र येण्यामागे भाजपाचा विरोध हे वरवर दिसणारे कारण असले तरी विधिनिषेधशून्य राजकारण करून सत्तेची फळे चाखण्यासाठीची त्यांच्यातील चढाओढच अंतिमतः त्यांचा घात करेल.  त्यांच्या एकत्र येण्यामागे कोणतेही वैचारिक व धोरणात्मक अधिष्ठान नाही.  सध्या तरी हिरेन हत्या आणि शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपातून परस्परांना वाचविण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. सरकारमधून कोणी ही बाहेर पडले, तर अन्य पक्ष त्यांची पोलखोल करतील ही भीती‌ या सर्वांना  आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे‌ यांनी व्यक्त केले.

पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्या रोशन लोखंडे टोळीविरुद्ध 'मोक्का', पोलिस आयुक्तांकडून कडक कारवाई

महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय वातावरण, पश्चिमी बंगाल, केरळ, आसाममधील निवडणुका आदी मुद्द्यांवर 'सकाळ'शी ते बोलत होते. महाराष्ट्रातील सरकारला  नैतिक अधिष्ठान नाही. सत्तेसाठी तडजोड करून ते एकत्र आले आहेत. त्यात सध्याच्या राज्यातील घडामोडी पाहाता सत्तेतील तिन्ही पक्ष बदनाम झाले आहेत. सचिन वाझे हे शिवसेनेशी संबंधित होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल देशमुख यांच्यावर पैसे वसुलीचे आरोप आहेत. काँग्रेसही या प्रकाराला पाठिशी घालत असल्यामुळे या सर्व पक्षातील आमदारांची  अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शिवसेनेबरोबर भाजपच्या फेरजुळणीच्या शक्यतेबाबत प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, कि हे सर्व जर-तर चे प्रश्न आहेत, ते काल्पनिक आहेत. महाविकास आघाडी सरकारमुळे आपणास पुन्हा निवडून येणे अशक्य होईल, याची जाण निर्माण झालेले काही आमदार आघाडीपासून वेगळे होत नाहीत, तोपर्यंत या चर्चेला काहीही आधार नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या पश्चिम बंगाल निवडणुकीत कोलकाता शहरातील काही मतदार संघांची जबाबदारी सांभाळणारे सहस्रबुद्धे या निवडणुकींबद्दल  भाष्य करताना ते म्हणाले, "अंडरकरंट म्हणतात तशी प्रभावी पण काहीशी अव्यक्त लाट भाजपाच्या बाजूने सर्वदूर दिसून येत आहे. ममता बॅनर्जी यांच्या कारभाराच्या शैली विरोधात जनतेचा रोष सर्वत्र दिसून येत आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा भ्रष्टाचार आणि गुंडगिरी यांमुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यात काँग्रेस-डावे हे ममता यांच्या विरोधात ठाकल्याने मतविभाजनाचा फटका त्यांना बसणार आहे. सध्याच्या परिस्थितीत तेथे भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल असा मला ठाम विश्वास वाटतो !"

loading image