'या' भाजपच्या बड्या नेत्यानं केलं शरद पवारांचं कौतुक; म्हणालेत... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

विरोधी पक्ष भाजपकडून सतत महाविकास आघाडीच्या सरकारवर आरोप केले जात आहेत. मात्र या आरोप-प्रत्यारोपांमध्ये एका बड्या भाजप नेत्यानं शरद पवारांचं भरभरून कौतुक केलंय. 

मुंबई: राज्याभोवती कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत चालला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल १ लाखच्या वर पोहोचली आहे. मात्र अशा कठीण परिस्थितीतही राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष भाजपकडून सतत महाविकास आघाडीच्या सरकारवर आरोप केले जात आहेत. मात्र या आरोप-प्रत्यारोपांमध्ये एका बड्या भाजप नेत्यानं शरद पवारांचं भरभरून कौतुक केलंय. 

"शरद पवारांच्या कामाचा वेग प्रचंड आहे आणि संपूर्ण देशानं हे पाहिलं आहे. आम्ही त्यांच्यावर सतत टीका करतो ते काय त्यांच्याबद्दल अनादर म्हणून नाही, तर त्यांचा आदर ठेवूनच. त्यांना मानलंच पाहिजे", असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलंय. ते पत्रकारांशी बोलत होते. 

हेही वाचा: आज शाळेची पहिली ऑनलाईन घंटा...चला मुलांनो अभ्यासाला लागा

"शरद पवार या वयातही कोकणात गेले. अजित पवार किंवा जयंत पाटील गेले का? मात्र शरद पवार गेले म्हणून त्यांना मानलंच पाहिजे," असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलंय. 

राज्य सरकारवर केली टीका: 

कोरोनाची महाभयंकर परिस्थिती हाताळण्यात हे महाविकास आघाडीचं सरकार अपयशी ठरत आहे. हे सरकार गोंधळलेलं आहे. कोण निर्णय करणार आणि कसे करणार याबाबतीत प्रचंड गोंधळ आहे. त्यामुळे लवकर कोणत्याही बाबतीत निर्णय होत नाहीये. तसंच अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याचा निर्णय होत नाहीये, उद्यापासून शाळा सुरु होणार की नाही हा निर्णय अजूनही झाला नाहीये. हे सरकार गोंधळलेलं आणि लेचपेचं असल्यामुळेच कोणताही निर्णय होत नाहीये," असे आरोप चंद्रकांत पाटील यांनी केले आहेत.

हेही वाचा: आता इन्फ्रारेड कॅमेरा तुमच्या शरिराच्या तापमानावर लक्ष ठेवणार; पण कुठे? वाचा बातमी सविस्तर

चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांच्या कामाचं कौतुक करत महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांवर आणि मुख्यमंत्र्यांवर मात्र निशाणा साधला आहे.  

BJP leadera and maharashtra pradeshadhyksha chandrakant patil praises sharad pawar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leadera and maharashtra pradeshadhyksha chandrakant patil praises sharad pawar