esakal | आज शाळेची पहिली ऑनलाईन घंटा...चला मुलांनो अभ्यासाला लागा
sakal

बोलून बातमी शोधा

आज शाळेची पहिली ऑनलाईन घंटा...चला मुलांनो अभ्यासाला लागा

आजपासून सुरु होणारी शाळा ऑनलाईन डिजिटल पद्धतीनं होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांप्रमाणे पालकही तेवढेच उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

आज शाळेची पहिली ऑनलाईन घंटा...चला मुलांनो अभ्यासाला लागा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई- दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. राज्य सरकार आणि शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पावलं उचलण्यास सुरूवात केली. शालेय जगातील नव्या तंत्रस्नेही युगामध्ये मुले-मुली 'एंटर' होतील. या नव्या 'न्यू नॉर्मल'बाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक उत्सुक असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला सुट्टी मिळाली होती. त्यामुळे परीक्षा न घेताचा मुलांना पास करण्यात आलं. दरम्यान शाळा कधी आणि कशा पद्धतीने सुरू होणार, याबाबतची अधिकृत तारीख अद्याप राज्य सरकारने जाहीर केलेली नाही. आजपासून सुरु होणारी शाळा ऑनलाईन डिजिटल पद्धतीनं होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांप्रमाणे पालकही तेवढेच उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी काहीही तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नये यासाठी शाळांनी इंटरनेट, वायफाय सिस्टीम, लॅपटॉप, कम्प्युटर अशा पायाभूत सुविधांची तयारी केली आहे. तसंच  'गुगल क्लासरूम'ची निर्मिती केली आहे. अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी झूम किंवा गुगल मीट या अॅपवर विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला आहे. मुख्याध्यापकांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं ऑनलाईन पद्धतीनं प्रशिक्षण पूर्ण केलं आहे. साधारण 8 जूनपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली. शालेय शिक्षण विभागानं देखील 'दिक्षा ऍप'च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याला साधारण दीड महिन्यापूर्वी सुरुवात केली आहे. 

सुरक्षित अंतरासाठी नागरिकांची खासगी वाहनाला पसंती! टू व्हिलर विक्रीला वेग येण्याची आशा

'बालभारती'ने इयत्ता पहिली ते बारावीच्या पाठ्यपुस्तकांच्या पीडीएफ विनामूल्य डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिल्यात. त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकांमधील 'क्यूआर कोड'च्या माध्यमातून शिक्षण सोपे करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच आजपासून शाळेला सुरुवात होतेय. पण ती शाळेची घंटा नसेल, आपआपल्या नव्या वर्गात धाव घेणारे विद्यार्थी विद्यार्थिनी नसतील. पहिल्या दिवशी शाळेत सोडणारे पालक नसतील.

loading image
go to top