भाजप नेते फडणवीसांच्या निवासस्थानी; पाटलांसह शेलार, दरेकरांची हजेरी

भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
Devendra Fadnavis-Chandrakant Patil | BJP Leaders Meet
Devendra Fadnavis-Chandrakant Patil | BJP Leaders Meet esakal

मुंबई : भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.२८) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विधानसभेत बहुमत चाचणी घेण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र राज्यपालांना दिले. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असून बहुमत चाचणी घेण्यात यावी, असे पत्रात सांगण्यात आले आहे. या पत्रानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तत्पूर्वी राज्यपालांच्या नावे एक खोटे पत्र व्हायरल झाले होते. (BJP Leaders Meet Devendra Fadnavis At His Residence In Mumbai)

Devendra Fadnavis-Chandrakant Patil | BJP Leaders Meet
Maharashtra Politics LIVE : राज्यपाल कोश्यारींच्या व्हायरल पत्रावरुन वाद

त्यात विधानसभेचे अधिवेशन ३० जून रोजी बोलवण्यात आल्याचा उल्लेख होता. त्यावरुन बराच गोंधळ झाला. त्यानंतर राजभवन सचिवांनी सदरील पत्र खोट असल्याचे स्पष्टीकरण दिले. दुसरीकडे फडणवीसांच्या पत्रानंतर एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) गटाची गुवाहाटीतील रॅडिसन हाॅटेलमध्ये तातडीची बैठक झाली. यात मुंबईत (Mumbai) जाण्यावर चर्चा झाली. दुसरीकडे मध्यरात्री भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार या नेत्यांसह इतरांचा समावेश होता.

Devendra Fadnavis-Chandrakant Patil | BJP Leaders Meet
फडणवीसांच्या पत्रानंतर राजकीय हालचालींना वेग, बच्चू कडू येणार उद्या मुंबईत

यावेळी चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. भेटीनंतर निवासस्थानाबाहेर असलेल्या प्रसारमाध्यमांशी कोणीही फडणवीस यांच्याबरोबर कोणती चर्चा झाली? यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. (Maharashtra Politics)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com