स्वराज यांच्या निधनामुळे भाजपची महाजनादेश यात्रा स्थगित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

सुषमा स्वराज स्वराज यांच्या निधनाने भाजपात शोकमग्न वातावरण आहे. दरम्यान  मंत्री संजय कुटे, आमदार चैनसुख संचेती, आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

खामगाव : भाजपाच्या जेष्ठ नेत्या केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव, खामगाव व मलकापूर येथे मुखमंत्री फडणवीस यांच्या जाहीर सभा रद्द करण्यात आल्या असून भाजपाची महाजनादेसहा यात्रा तात्पुरती स्तगीत करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद व केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा काढली असून ही यात्रा आज 7 ऑगस्‍ट रोजी बुलडाणा जिल्‍ह्‍यात होती. दरम्‍यान शेगाव, खामगाव व मलकापूर विधानसभा मतदार संघामध्ये मुख्यमंत्र्याच्‍या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. खामगाव मुख्यमंत्र्यांच्‍या आगमन प्रसंगी भव्‍य मोटरसायकल रॅलीचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते . बुधवारी अकोला येथील सभा आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठक घेण्यासाठी मुंबई रवाना झाले. आज ही बैठक घेवून ते विमानाने अकोला येवून नंतर बुलडाणा जिल्ह्यातील सभांना संबोधित करणार होते. मात्र रात्री केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन झाले. त्यामुळे महाजनादेश यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

सुषमा स्वराज स्वराज यांच्या निधनाने भाजपात शोकमग्न वातावरण आहे. दरम्यान  मंत्री संजय कुटे, आमदार चैनसुख संचेती, आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल शोकसंवेदना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Mahajanadesh rally hold on temporarily because of Sushma Swaraj Death