पवारांच्या दाव्याची भाजपकडून पोलखोल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

राष्ट्रपतींचे प्रसिद्धी सचिव अशोक मलिक यांनी ट्विट करून पवार यांना देण्यात आलेल्या आसनाबाबत खुलासा केला होता. शपथविधीसाठी अतिविशिष्ट व्यक्तींसाठी राखीव दालनातच पवार यांचे आसन राखीव ठेवण्यात आले होते व ते पहिल्या रांगेतच होते.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी अतिविशिष्ट व्यक्तींसाठी आरक्षित कक्षातील पहिल्या रांगेतील आसनच राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, तरिही माध्यमांमध्ये खोटी बातमी पेरण्यात आली, याची पोलखोल भाजपकडून करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींचे प्रसिद्धी सचिव अशोक मलिक यांनी ट्विट करून पवार यांना देण्यात आलेल्या आसनाबाबत खुलासा केला होता. शपथविधीसाठी अतिविशिष्ट व्यक्तींसाठी राखीव दालनातच पवार यांचे आसन राखीव ठेवण्यात आले होते व ते पहिल्या रांगेतच होते. परंतु या संदर्भात जारी करण्यात आलेल्या पासावर 'व्ही' असे रोमन लिपीत लिहिण्यात आले होते. कदाचित त्यामुळे पवार यांना पाचव्या रांगेत स्थान देण्यात आल्याची समजूत झाली असावी. हा समजुतीचा गोंधळ असावा.

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीच्या प्रसंगी पवार यांना पाचव्या रांगेतील स्थान देण्यात आल्याने त्यांनी शपथविधीस उपस्थित राहण्याचे रद्द केले. पवार यांना पाचव्या रांगेत स्थान, महाराष्ट्राचा अपमान अशा बातम्या जाणीवपूर्वक काही माध्यमे आणि पत्रकारांनी पेरल्याचा आरोप भाजपने केला आहे. महाराष्ट्रातून सहानुभूती मिळावी यासाठी हे सर्व केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP makes video on Sharad Pawar in PM Narendra Modi swearing ceremony