काँग्रेसचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात : महाजन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जून 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेस पक्ष फोडत आहेत. विधानसभेचे निकाल वेगळे असू शकतात. 
- अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष 
 

मुंबई : काँग्रेसचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असून, त्यांची नावे सांगितली तर अशोक चव्हाण यांना झोपही येणार नाही, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केल्यानंतर महाजन यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. चव्हाणांसोबत रात्रंदिवस फिरणारेच आम्हाला घ्या म्हणून फोन करत आहेत, असा दावा महाजनांनी केला. 

लोक फोडण्याचे काम नाही; पण जे लोक आमच्याकडे येत आहेत, त्यांना घेण्याचे काम आम्ही करत आहोत. आचारसंहितेला फक्त तीन महिने आहेत. ही 20-20 ची मॅच असून, पुढचा काळ आमचाच आहे, असा विश्‍वास महाजनांनी व्यक्त केला. आमच्या संपर्कात कोण आहेत याची यादी मी अशोक चव्हाणांना सांगितली तर त्यांचे उजवे-डावेही त्यांच्यासोबत राहणार नाहीत. त्यांच्यासोबत रात्रंदिवस फिरणारे आम्हाला घ्या म्हणून फोन करत आहेत. त्यांची नावे आता मी उघड करणार नाही, असे ते म्हणाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेस पक्ष फोडत आहेत. विधानसभेचे निकाल वेगळे असू शकतात. 
- अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष 

काँग्रेसचे 25 आमदार भाजपच्या संपर्कात असून, त्यांची नावे सांगितली तर अशोक चव्हाण यांना झोपही येणार नाही. 
- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP minister Girish Mahajan claims Congress 25 MLAs in touch with BJP