'..अन्यथा अस्लम शेख यांनी अवमान याचिकेसाठी तयार रहावं'

याप्रकरणी भाजपने संध्याकाळी सहापर्यंत त्यांना अल्टिमेटम दिला आहे.
political
politicalesakal

मुंबई महापालिका (BMC) निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपप्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam shaikh) यांनी विरोधकांवर निशाणा साधत भाजप (BJP) नगरसेवकांनीच २०११ मध्ये त्या मैदानासाठी टिपू सुलतान (Tipu sultan) या नावाचा प्रस्ताव दिला असल्याच सांगितलं. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक या संदर्भात लाचार झाले असुन वारंवार हा विषय काढत असून त्यांना जनतेच्या विकासाशी काहीही देणघेण नसल्याची टीका त्यांनी केली होती. दरम्यान त्यांच्या या टीकेला भाजपा आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी पलटवार केला आहे.

political
महाराष्ट्र आणखी गारठणार! २४ तासांत 'या' भागात थंडीची लाट

ते म्हणतात, मी काउन्सिलर असताना टिपू सुलतानच्या नावाचा कोणताही प्रस्ताव दिला नव्हता. जर मी तशा प्रस्तावाचं पत्र दिल्याची काही कागदपत्रे असतील तर द्या. नाहीतर अस्लम शेख यांनी अवमान याचिकेसाठी तयार रहावं, असा इशारा भाजपाचे अमित साटम यांनी दिला आहे. याप्रकरणी भाजपने संध्याकाळी सहापर्यंत त्यांना अल्टिमेटम दिला आहे.

दरम्यान, पालकमंत्री अस्लम शेख यांनी काल पत्रकार परिषदेत भाजपावर निशाणा साधला होता. टिपू सुलतानच्या नावाचा भाजपला खरंच एवढा विरोध असेल तर त्यांनी त्यांच्या विद्यमान आमदाराचा राजीनामा घ्यावा, ज्यानं टिपू सुलनातच्या नावाच्या रस्त्याला अनुमोदन दिलं आहे. या राजीनाम्यातून भाजपनं संपूर्ण देशाला हे सांगावं, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. मालाड येथील क्रीडा संकुलाच्या नावावरुन भाजप, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते यावर भाष्य करताना त्यांनी भाजपला हा सल्ला दिला.

political
...तर भाजपनं 'त्या' आमदाराचा राजीनामा घेऊन दाखवावं - अस्लम शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com