BJP MLA Ganesh Naik I गणेश नाईक उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता, अटकेची कारवाई होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Ganesh Naik

सीबीडी पोलिस ठाण्यात रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

गणेश नाईक उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता, अटकेची कारवाई होणार?

शारीरिक शोषण आणि रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावल्याप्रकरणी दाखल असलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्‍ह्यांमध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आमदार गणेश नाईक यांच्या हालचाली सुरु आहेत. ठाणे सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांच्या विरोधातील दोन्ही गुन्ह्यात अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर गणेश नाईक आज हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनाकरिता धाव घेण्यासाठी सात दिवसांचा अंतरिम जामीन देण्याची नाईक यांच्या वकिलाने केलेली मागणीही न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांना आता कधीही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे सत्र न्यायालयानं गणेश नाईकांचा जामीन नाकारल्यानंतर कोणत्याही क्षणी त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते.

हेही वाचा: मी भोळा नाही, मी फसणार नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्ला

भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्यासोबत २७ वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या ४८ वर्षीय महिलेने त्यांच्यावर लैंगिक व शारीरिक शोषणाचा आरोप करत त्यांच्याविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्याआधारे पोलिसांनी नाईक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीडी पोलिस ठाण्यात रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही गुन्ह्यांत अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी गणेश नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज केले होते; मात्र बुधवारी किंवा गुरुवारीही त्यांना अंतरिम जामीन मिळू शकलेला नाही. यामुळे नाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याची शक्यता आहे.

काय आहे आमदार नाईकांचं प्रकरण?

गणेश नाईक यांच्यासोबत प्रेमसंबंध असणाऱ्या एका महिलेनं तब्बल 27 वर्षांनी बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात कलम 376 अन्वये गुन्हा दाखल आहे. तर रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यातही नाईक यांच्याविरुद्ध याच महिलेनं स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. नेरुळच्या गुन्ह्यासंदर्भात अनेकदा आपल्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवले गेल्याचे या महिलेनं तक्रारीमध्ये म्हटलं आहे. नवी मुंबई पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासही सुरुवात करुन या महिलेची वैद्यकीय चाचणीही केली. त्यानंतर नाईक यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीनाचा अर्ज दाखल केला होता. ही सुनावणी न्यायमूर्ती एन. के. ब्रम्हे यांच्या न्यायालयात घेण्यात आली.

हेही वाचा: यूपीत धार्मिक स्थळांवरील ५३,९४२ भोंगे उतरवले, योगी सरकारची कारवाई

Web Title: Bjp Mla Ganesh Naik Arrested Possibility File Bail Application In High Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top