
मी भोळा नाही, मी फसणार नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्ला
ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही, असा आरोप भाजपाकडून सातत्याने होत असतानाच त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाने बाळासाहेबांना फसवल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्यामुळेच मी भाजपाशी धूर्तपणे वागत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
'लोकसत्ता'च्या एका कार्यक्रमात काल ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले,"माझ्यावर आरोप होतो की ही शिवसेना बाळासाहेबांची नाही. मी म्हटलं हो बरोबर आहे. बाळासाहेब ठाकरे भोळे होते. पण मी भोळा नाही, मी धूर्त आहे आणि मी भाजपाच्या अजेंड्याला बरोबर ओळखून आहे. मी त्यांना यशस्वी होऊ देणार नाही. माझं त्यांच्या प्रत्येक कृतीकडे आणि रणनीतीकडे बारकाईने लक्ष आहे. "
हेही वाचा: "फुकटात करमणूक मिळतेय तर..."; उद्धव ठाकरे राज यांच्यावर बरसले
भाजपा राज्यात खालच्या दर्जाचं राजकारण करत असल्याचा आरोपही ठाकरेंनी केला आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असं लोकच भाजपाला विचारतील, असंही ठाकरे म्हणाले. हिंदुत्वाबद्दल बोलताना ते म्हणाले,"शिवसेनेसाठी हिंदुत्व हा श्वास आहे. आम्हाला सारखं सारखं आमचं हिंदुत्व सार्वजनिकरित्या सिद्ध करण्याची गरज नाही."
उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा नेते हिंदुत्वाच्या नावाखाली युती टिकवण्यासाठी सतत बाळासाहेब ठाकरेंना फसवत होते. पण बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा, राज्याचा आणि देशाचा व्यापक विचार करून भाजपाच्या या खोड्या डोळ्याआड केल्या. पण मी भोळा नाहीये.
Web Title: I Am Not So Naive As Balasaheb Thackeray Says Cm Uddhav Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..