
भगवान खैरनार,मोखाडा: विधानसभा निवडणुकीचा धुराळा शांत होत नाही तोच, महिनाभराच्या आत, पालघर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजु लागले आहेत. जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी नवनिर्वाचित आमदार हरिश्चंद्र भोये यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणे सुरू केले आहे. मोखाडा तालुक्यात आमदार भोये यांनी बुध प्रमुखांचा मेळावा घेऊन जिल्हा परिषद निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.