Gram Panchayat Election: भाजपचा सरपंच निवडून द्या, माझ्याकडून ५० लाखांचा निधी; नितेश राणेंचा Video Viral

BJP MLA Nitesh Rane offering money for unopposed Sarpanch post gram panchayat election video goes viral rak94
BJP MLA Nitesh Rane offering money for unopposed Sarpanch post gram panchayat election video goes viral rak94

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गावामध्ये मोठ्या प्रमाणात चुरस पाहायला मिळते, यादरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे हे बिनविरोध सरपंच पदासाठी पैशांची ऑफर देत असतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. नेहमीच त्यांच्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेत असणारे नितेश राणे कोकणातील एका गावात भाषण करताना गावकऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्यासाठी पैशांचे अमिष देताना दिसत आहेत.

या भाषणाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राणे बोलताना दिसत आहेत. भाजपकडून बिनविरोध सरपंच निवडून आणणाऱ्या गावाला ५० लाख निधी माझ्याकडून देईल अशी ऑफर देताना नितेश राणे दिसत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी गावकऱ्यांना ही मोठी ऑफर दिली.

हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

BJP MLA Nitesh Rane offering money for unopposed Sarpanch post gram panchayat election video goes viral rak94
Maharashtra Politics: सरकार पडेल म्हणणाऱ्या राऊतांना शिंदे गटाचा खोचक टोला; म्हणे, "अहो, तुमचे…"

नितेश राणे म्हणाले की, माझी एकच अट आहे, भारतीय जनता पक्षाचा सरपंच आणि सदस्य त्या ठिकाणी बसले पाहिजेत. त्यासाठी जी ताकद द्यायचीय ती तुम्ही निवडा, पुढे मी हेही सांगतो की, भाजपचा सरपंच बिनविरोध तुम्ही निवडूण देईल, त्या गावाला मी माझ्याकडून ५० लाखांचा निधी मी माझ्याकडून जाहीर करतो असे ते म्हणाले आहेत. नितेश राणेंचा हा व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होत आहे.

BJP MLA Nitesh Rane offering money for unopposed Sarpanch post gram panchayat election video goes viral rak94
Nikhil Khadse Death : निखिल खडसेंची आत्महत्या की हत्या? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com