'आमच्या मातीत हा कार्टा कसा निघाला...', नितेश राणेंचे अनिल परबांबद्दल वक्तव्य | Nitesh rane | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Nitesh Rane

'आमच्या मातीत हा कार्टा कसा निघाला...', नितेश राणेंचे अनिल परबांबद्दल वक्तव्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- सुशांत सावंत

मुंबई: "मला आज दोन ते तीन मच्छर बाटलीत भरून द्या. मी अनिल परब (Anil parab) याच्या घरी नेऊन सोडतो. अनिल परब सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. पण आमच्या मातीत हा कार्टा कसा निघाला हे कळत नाही" असं वक्तव्य भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh rane) यांनी केलं आहे. आझाद मैदानात (Azad maidan) एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन (ST Strike) सुरु आहे. तिथे नितेश राणे बोलत होते. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज शस्त्रक्रिया झाली. पण उद्धव ठाकरेंना कणा दिला आहे का?" असा प्रश्न पडतो. "शाहरुखचा मुलगा जेलमध्ये असताना यांना झोप देखील लागत नाही. विलीनीकरण झाले तर अनिल परब कशी वसुली करणार?" अशी टीका नितेश राणे यांनी केली.

"अनिल परबला काही पाठवायचे असेल तर बदाम पाठवा. त्याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. डोक्यावर चार-पाच केस राहिले म्हणून त्याला काही कळत नाही. 14 ते 19 मध्ये तुझाच रावते परिवहन मंत्री होता. तो काय एमआयएमचा होता का?" असा सवाल नितेश राणेंनी विचारला.

हेही वाचा: 'नेत्यासोबत सेक्ससाठी मला भाग पाडलं', दाऊदच्या साथीदाराच्या पत्नीचा खुलासा

"हा जी वसुली करतो ती सर्व उद्धव ठाकरेला द्यावी लागणार. कर्मचाऱ्यांनो तुम्ही आत्महत्या का करता? या सरकार मधील एक ते दोन लोकांना घेऊन जाऊ की. तुम्ही आत्महत्या का करता तुमचा आमच्यावर विश्वास नाही का? आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र पेटवू" असे नितेश राणे म्हणाले.

हेही वाचा: विधान परिषदेवर रामदास कदम यांच्याजागी वरुण सरदेसाई की, सचिन अहिर?

"आपण शिवरायांच्या राज्यात राहतो. आत्महत्या हा पर्याय नाही. 93 च्या ब्लास्टमधील मंत्री सरकारच्या मांडीला मांडी लावून बसला आहे. जर कोणी फूट पाडण्याचा प्रयत्न केला तर त्याची गाठ नितेश राणे सोबत आहे. निलंबन केल्यानंतर हे मंत्री कसे राज्यात फिरतात ते आम्ही बघतो. हिंमत असेल तर या आझाद मैदानात" असे आव्हान नितेश राणे यांनी दिलं.

loading image
go to top