बेताल वक्तव्यांबद्दल राम कदमांची अखेर माफी

Ram Kadam
Ram Kadam

मुंबई : 'तुम्हाला जर एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तर मला सांगा. मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो, असे बेताल वक्तव्य करणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांना आज (गुरुवार) अखेर तीन दिवसांनंतर उपरती झाली असून, त्यांनी आज माफी मागितली आहे.

सोमवारी घाटकोपर येथे दहीहंडीमध्ये राम कदम यांनी मुक्ताफळं उधळल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली होती. राज्यभर त्यांचा निषेध करण्यात येत होता. त्यांनी गेल्या दोन दिवसांपासून माफी न मागता दिलगिरी व्यक्त केली होती. अखेर त्यांनी ट्विटरवरून त्यांनी माफीनामा सादर केला आहे. कदम म्हणाले होते, की तुम्ही कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केले, पण ती मला नाही म्हणते, प्लिज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन की, तुम्ही तुमच्या आईवडिलांना घेऊन या. आई-वडील म्हणाले, की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा, असे त्यांनी म्हटले होते. यावरून राज्यभर वादंग उठले असून, राम कदम यांच्यावर जोरदार टीका होत होती.

यावर त्यांनी माफीनामा सादर करताना म्हटले आहे, की माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली. या प्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे.

राम कदमांना त्यांच्या वादग्रस्त विधानाची महिला आयोगाने स्वतःहून (स्युमोटो) दखल घेतली आहे. आयोगाने कदम यांना आठ दिवसांत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com