esakal | भारतातील इंधन दरवाढ तालिबानमुळे; भाजप आमदाराच वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

Aravind Bellad

भारतातील इंधन दरवाढ तालिबानमुळे; भाजप आमदाराच वक्तव्य

sakal_logo
By
सुधीर काकडे

देशात सध्या इंधन आणि आणि घरगूती गॅसच्या किमती वाढत (Price hike) असल्याने लोकांमध्ये रोष पाहायला मिळतो आहे. विरोधीपक्षाने या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर (Central Government) टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना इंधन दरवाढीबद्दल प्रश्न विचारला असता त्यांच्याकडून वेगवेळे उत्तर मिळत आहेत. हुबळी-धारवाडचे भारतीय जनता पक्षाचे आमदार अरविंद बेलाड (Aravind Bellad) यांनी देखील असेच एक विधान केले आहे. इंधन दरवाढीबद्दल प्रश्न विचारला असता आमदार बेलाड यांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबान आल्यापासून कच्च्या तेलाच्या पुरवठा कमी झाला आणि त्यामुळे इंधन दर वाढत असल्याचा तर्क लावला आहे.

मे महिन्यापासून इंधन दरवाढ सुरु झाली असून गेल्या काही दिवसांत एलपीजी गॅस, डिझेल आणि पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याच विषयावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता भारतीय जनता पक्षाचे आमदार अरविंद बेलाड यांनी या गोष्टीला अफगाणिस्तानमधली परिस्थिती कारणीभुत असल्याचे सांगितले आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबान आल्यामुळे निर्माण झालेल्या संकटामुळे कच्च्या तेलाची आयात कमी झाली. त्यामुळे देशात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या, असे विधान बेलाड यांनी यावेळी केले आहे. तसेच पुढे बोलताना ते असेही म्हणाले की, मतदाते हुशार असून त्यांना दरवाढीची कारण समजतात.

हेही वाचा: शेतकऱ्यांना अडवाल तर खबरदार!

दरम्यान, भारतात मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात केली जाते. कच्च्या तेलाची आयात करणाऱ्या देशांमध्ये भारत जगात तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र भारत ज्या देशांतून तेलाची आयात करतो त्या देशांमध्ये अफगाणिस्तानचा समावेश नाही. जुलै २०२१ पर्यंतचा विचार केल्यास भारत इराक, सौदी अरब, संयुक्त अरब अमीरात, नायजेरिया, अमेरिका आणि कॅनडा या देशातूनच कच्च्या तेलाची आयात केली जाते.

loading image
go to top