शेतकऱ्यांना अडवाल तर खबरदार!

महापंचायतीला जाण्सासाठी अडविल्यास विरोध मोडून काढू : टिकैत
 टिकैत
टिकैतsakal

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा व्यापक आविष्कार शेतकरी महापंचायतीच्या रुपाने उद्या (ता.५) मुझफ्फरनगर येथे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सुरक्षा यंत्रणेचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या महापंचायतीला यशस्वी करण्यासाठी भारतीय किसान युनियनने देखील जय्यत तयारी केली आहे. तसेच पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखल्यास हा विरोध मोडून काढण्याचा इशारा राकेश टिकैत यांनी दिला आहे.

 टिकैत
केंद्र लादतेय खासगीकरण : चिदंबरम

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये ही महापंचायत होणार आहे. त्यासाठी दोन लाख शेतकरी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते. टिकैत यांनी मात्र किती शेतकरी या महापंचायतीसाठी उपस्थित राहणार, याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहतील, असा दावा त्यांनी केला आहे. या महापंचायतीमध्ये केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांबाबत निश्‍चित धोरण ठरविले जाण्याची चिन्हे आहेत. तसेच गेल्या नऊ महिन्यांपासून केंद्र सरकार कृषी कायद्याबाबत वेळकाढूपणा करीत असल्याने त्याविरोधात हे एक शक्ती प्रदर्शन देखील मानले जात आहे.

 टिकैत
काश्मिरी जनतेचे अधिकाऱ्यांना सहकार्य

पंजाबमधून सुमारे दोन हजार शेतकरी मुझफ्फरनगरला पोहोचण्याची शक्यता आहे. दिल्ली सीमा म्हणजे सिंघू, गाझी आणि टिकरी सीमा या धरणे स्थळांवरून महापंचायतीकडे अनेक शेतकरी रवाना होणार आहेत. महाराष्ट्रातूनही शेतकरी येणार असल्याचे सांगण्यात येत आहो. ही महापंचायत उत्तर प्रदेशात आहे. त्यामुळे तेथील सरकारही सतर्क झाले आहे. महापंचायतीसाठी प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मुझफ्फरनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची अडवणूक केली जाण्याची शक्यता आहे. याबाबत टिकैत यांना विचारले असता, त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, ‘‘महापंचायत शांततेच्या मार्गाने होईल. परंतु त्यापासून शेतकऱ्यांना अडविणार असेल, तर त्यांचा हा विरोध मोडून काढू ’’

 टिकैत
ममतांना दिलासा! पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीची घोषणा

मिशन उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक आहे. तिथे भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मात्र, केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने आता तेथेही शेतकऱ्यांचा जोर वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचे रणशिंक मुजफ्फरनगर महापंचायतीमधून फुंकले जाऊन 'मिशन यूपी' अशी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पश्चिम उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर जमाव करण्याचा उद्देश आहे. शेतकरी त्यांच्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशात 18 महापंचायती आयोजित करण्याची योजना आखत आहेत. याबाबत टिकैत म्हणाले, 'केवळ निवडणुका आहेत म्हणून ही महापंचायत नाही. निवडणूक तर सहा महिन्यांनी आहे. शेतकरी तर अनेक वर्षांपासून समस्यांना तोंड देत आहेत. उसाच्या किमतीत 2016 पासून वाढ झालेली नाही. केंद्राने त्यात पाच रुपये-पाच पैसे प्रति किलोने वाढ केली आहे. तुम्ही शेतकऱ्यांचा अपमान करता का," असा सवाल टिकैत यांनी उपस्थित केला आहे.

 टिकैत
विधानभवनात नमाजसाठी जागा; त्यानंतर भाजपने केली खास मागणी

सुरक्षा व्यवस्था तैनात

महापंचायतीसाठी सुमारे पाच हजार स्वयंसेवकांन जबाबदारी देण्यात आली आहे.  सुरळीत हालचाली सुनिश्चित करण्यासाठी ओळखपत्र देण्यात आले आहेत. ज्यांना गर्दीमुळे कार्यक्रमस्थळी पोहचता येत नाही, त्यांच्यासाठी डिजिटल स्क्रीनची व्यवस्था किसान सभेने केली आहे. पोलिसांनी देखील  सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. याशिवाय या कार्यक्रमाची व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com