सी.आर पाटलांनी कट शिजवला, सूत्र दिल्लीतून हालली आणि फडणवीसांनी चाल केली!

Amit-Shah-CM-Devendra-Fadnavis
Amit-Shah-CM-Devendra-Fadnavis

विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस बाहेर येऊ लागली आहे. भाजपने पाचही जागा निवडून आणल्यानंतर सत्ताधाऱ्यांमध्ये 'ब्लेमगेम'ला सुरुवात झाली आहे. राज्यसभेला भाजपाला १२३ मतं मिळाली होती. मात्र विधानपरिषदेला १३३ मतं मिळाल्याने काँग्रेस आणि शिवसेनेची मतं फुटल्याचं समोर आलंय. महाविकास आघाडीची एकूण २१ मतं आणि शिवसेनेच्या गोटातील दहा मतांचा सौदा झाल्याची चर्चा आहे. (MLC Election 2022)

याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माघारी मतदारसंघात निघालेल्या आमदारांना पुन्हा मुंबईत बोलावलं. शिवसेनेतर्फे तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र, निकालानंतर एकनाथ शिंदे यांचा गट नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. शिंदे यांचा कालपासून फोन नॉट रिचेबल आहे. ते गुजरातच्या सुरतमध्ये आहेत. (Shivsena in MLC Election 2022)

मात्र शिवसेना फोडण्याचा आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा डाव आधीच शिजला होता, हे आता स्पष्ट होत आहे. संजय राऊत यांच्या पत्रकारपरिषदेनंतर या राजकीय डावपेचांमागे कोण आहे, हे समोर आलं आहे.

Amit-Shah-CM-Devendra-Fadnavis
Eknath Shinde LIVE : वेळ साधली? देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना

पूर्वनियोजित खेळी... आणि रात्रीतून आमदार गुजरातमध्ये

विधानपरिषदेचं मतदान पार पडताच शिंदे समर्थक आमदारांसह सुरतला सुरक्षित स्थळी पोहोचणार असल्याचं आधीच ठरलं होतं. गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी यंदा राजकीय खेळी केली आहे. याला फडणवीस आणि अमित शाहांचं पाठबळ मिळालं. सी. आर. पाटील यांनी याआधीही गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली होती.

यावेळीच हा कट शिजल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मतदान झाल्यानंतर सुरतला रवाना व्हायचं, हे एकनाथ शिंदेंनी पूर्वनियोजित केलं होतं. मतदानानंतर आमदारांना रातोरात गुजरातला नेण्याच्या प्लॅनसाठी पाटील यांनी रसद पुरवली.

Amit-Shah-CM-Devendra-Fadnavis
एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेआधीच सोमय्यांचं ट्वीट, आकड्यांचा हिशेबच दिला

यंदा 'गेमचेंजर' गुजरातचा मराठी माणूस!

सी.आर पाटील यांनी ही खेळी केल्याच्या वृत्ताला राऊतांनीच दुजोरा दिला. पाटील हे भाजपचे खासदार आणि प्रदेशअध्यक्ष आहेत. सी.आर. पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या दोघांचेही निकटवर्तीय मानले जातात. राजकीय डावपेच आखण्यासाठी ते ओळखले जातात. रुपाणी यांची पकड कमी झाल्यानंतर मोदींच्या गटाने पाटील यांचं नाव पुढे केलं होतं. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.

१९८९ मध्ये त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. २००९ साली त्यांनी भाजपाच्या तिकीटावर नवसारीमधून लोकसभा निवडणूक लढवली. २०१४ मध्येही ते दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीत ते देशात सर्वाधिक मतं मिळालेल्या उमेदवारांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होते.

शिंदे गट वेगळा तयार करून भाजपाला पाठिंबा देण्याची शक्यता

शिंदे यांना समर्थन देणारा मोठा गट भाजपला पाठिंबा देऊ शकतो. पक्षांतर बदल करण्याच्या कायद्यानुसार शिंदेंवर कारवाई होऊ शकते. सध्या शिवसेनेकडे 56 आमदार आहेत. यातील एकाचा नुकताच मृत्यू झाला. आता 20 आमदार फोडण्यात शिंदेंना यश आलं तर हा कायदा लागू होणार नाही.

त्यातच अपक्ष सोबत घेऊन शिंदेंनी भाजपच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला, तर अन्य अपक्षही त्यांच्यासोबत येतील. महाविकास आघाडीची मोठ्या प्रमाणात मतं फोडून भाजपचे परिषदेवर प्रसाड लाड यांना निवडून आणलं. यानंतर क्रॉसवोटिंगची संख्या वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com