राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचाच विरोध, प्रवीण दरेकर म्हणाले... | Pravin Darekar Comment On Raj Thackeray | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray And Pravin Darekar

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचाच विरोध, प्रवीण दरेकर म्हणाले...

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रीजभूषण शरणसिंह यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. उत्तर भारतीयांचा राज यांनी अपमान केला आहे. त्यांनी माफी मागावी. अन्यथा त्यांना अयोध्यात घुसू देणार नाही, असा इशारा ब्रीजभूषण यांनी दिला आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भेटू नये, असा सल्ला त्यांनी दिला आहे. याबाबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, समन्वयतातून मार्ग काढू व राज ठाकरेंचा अयोध्या दौराही होईल. (BJP MP Oppose Raj Thackeray Visit Of Ayodhya, Pravin Darekar Says, Draw Middle Way)

हेही वाचा: 'उत्तर भारतीयांची माफी मागा ! अन्यथा राज ठाकरेंना अयोध्यात घुसू देणार नाही'

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला होत असलेल्या विरोधावर मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईच्या विकासात परप्रांतीयांचेही योगदान आहे. खासदारांनी मुंबईत येऊन परिस्थित पाहावी. त्यांचा मुद्दा भावनिक आहे, असा टोला किल्लेदार यांनी ब्रीजभूषण यांना लगावला आहे.

हेही वाचा: राज ठाकरे आग्रह धरतायत ते डेसिबल म्हणजे काय असतं

योगी सरकारने दौऱ्यावर येण्यास अनुमती दिली आहे. पूर्वनियोजित दौरा आहे. उगाचच वेगळा अर्थ काढून वादंग निर्माण करण्याचे कारण नाही, असे किल्लेदार म्हणाले.

Web Title: Bjp Mp Oppose Raj Thackeray Visit Of Ayodhya Pravin Darekar Says Draw Middle Way

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top