
राज ठाकरे आग्रह धरतायत ते डेसिबल म्हणजे काय असतं
राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर राज्यभरातल्या विविध ठिकाणी मनसे सैनिकांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. सकाळपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर अखेर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पक्षाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलंय. कोणत्याही परिस्थितीत भोंगे बंद झाले पाहिजे, असे भाष्य त्यांनी पत्रकार परिषदेतून केले. या पत्रकार परिषदेत त्यांनी भोंग्याच्या आवाजासंदर्भात बोलताना आपल्या घरच्या मिक्सरच्या आवाज इतकाच डेसीबल असावा, असे म्हटले.
सध्या राज ठाकरे ज्या डेसिबलवरुन आग्रह धरतायत, ते डेसिबल काय असतं तुम्हाला माहिती आहे का? (Know about decibel means what as it is trending in maharashtra now)
हेही वाचा: 'भोंगेबाज राजकारण्यांनी हिंदुत्वाचा...', राज यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांचं ट्विट
माणसाच्या सहनशक्तीपलीकडे असणाऱ्या आवाजापेक्षा जास्त आवाज लाउड स्पीकर्सचा, भोंग्यांचा वा डिजेचा असतो. याचा वापर प्रार्थनेसाठी, धार्मिक आवाहनासाठी वा मिरवणुकांसाठी करताना भारतात वारंवार दिसून आलाय. अनेकजण म्हणतात, प्रार्थना वा मिरवणुकींसाठी भोंगे वापरणे ही परंपराच आहे. पण, लाउड स्पीकर्सचा शोध तर दूरध्वनीसह १८६१ मध्ये लागला, आणि सध्या आपण अनुभवत असलेल्या लाउड स्पीकर्सचा शोध तर नंतर तिसेक वर्षांनी लागला. मात्र मानवी जीवनाला त्रास होऊ नये, म्हणून डेसिबल ठरविण्यात आले. त्या डेसिबलचा आपण योग्य वापर करतोय का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
हेही वाचा: Sandeep Deshpande: संदीप देशपांडेचा मुंबई पोलिसांना चकवा
डेसिबलची व्याख्या
"डेसिबल एक लॉगरिथमिक युनिट आहे जे गुणोत्तर किंवा वाढ दर्शवते. डेसिबलचा वापर ध्वनिक लाटा आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नलची पातळी दर्शविण्यासाठी केला जातो."
श्वासाचा आवाज हा १० डेसिबल तर पानांच्या सळसळण्याचा आवाज २० डेसिबलपर्यंत जातो. सामान्य आवाजातील संभाषण हे ६० डेसिबल असते. ध्वनिप्रदूषण नियमन कायद्यानुसार निवासी क्षेत्रातील आवाजाची मर्यादा ५५ डेसिबल आहे. त्यानुसार सामान्य आवाजातील सततचे संभाषणही ध्वनिप्रदूषणात मोडते.
हेही वाचा: उद्धव ठाकरे आणि माझ्या पत्नीत एक साम्य; फडणवीसांचं मिश्किल विधान
निवासी क्षेत्रास सकाळी ५५ डेसिबल तर रात्री ४५ डेसिबलची मर्यादा आहे. व्यावसायिक क्षेत्रात अनुक्रमे ६५ व ५५ डेसिबल तर औद्य्ोगिक क्षेत्रात ही मर्यादा ७५ व ७० डेसिबलपर्यंत ठेवण्यात आली आहे. यातील ए म्हणजे मानवी कानांनुसार केलेली आवाजाची वर्गवारी.
मुंबई उच्च न्यायालय म्हणतात की डेसीबल पातळीची कायदेशीर मर्यादा राखणे हे सर्व धर्मांसाठी लागू आहे.
Web Title: Know About Decibel Means What As It Is Trending In Maharashtra Now
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..