तावडेंना भाजप डावलतंय? कुछ तो गडबड है...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जाणाऱ्या खासदार संभाजीराजेंकडून विनोद तावडेंवर जाहीर टीका करण्यात आली आहे. पुरग्रस्तांच्या मदतीवरून संभाजीराजेंनी तावडेंना सुनावत आम्हाला भीक नको असे म्हटले आहे. यावरून भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर आल्याचे बोलले जात आहे.

मुंबई : लोकसभा प्रचारात सहभागी करून न घेणे, अचानक खाते बदलणे आणि आता पक्षाच्या खासदाराकडूनच थेट टीका होणे यावरून विनोद तावडे यांना भाजप डावलत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जाणाऱ्या खासदार संभाजीराजेंकडून विनोद तावडेंवर जाहीर टीका करण्यात आली आहे. पुरग्रस्तांच्या मदतीवरून संभाजीराजेंनी तावडेंना सुनावत आम्हाला भीक नको असे म्हटले आहे. यावरून भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर आल्याचे बोलले जात आहे.

विनोद तावडे मंत्रीमंडळात व पक्षातही हळूहळू वंचित होताहेत हे गेल्या काही घडामोडींवरून दिसून येते. लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांना फक्त पत्रकार परिषदांपुरते मर्यादित ठेवण्यात आले. नंतर कोणतीही कल्पना न देता त्यांच्याकडील महत्त्वाची खाती काढून घेण्यात आली. अन् आता छत्रपती संभाजीराजेंनी त्यांना सुनावलेले खडे बोल. यावरून काहीतरी गडबड असल्याचे स्पष्ट दिसते. पुरग्रस्तांसाठी निधी गोळा करण्यासाठी अभिनव उपक्रम राबवूनही त्यांना लक्ष्य करण्यात आले. तावडे हे गडकरी गटाचे मानले जात असल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे का? अशाही चर्चा सुरु आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP MP Sambhaji Raje criticize minister Vinod Tawde