सभापती निवडीतही भाजपच "नंबर 1' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

मुंबई - राज्यातील 25 जिल्ह्यांमध्ये 284 पंचायत समित्यांमध्ये झालेल्या सभापती आणि उपसभापतिपदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हाच "क्रमांक 1'चा पक्ष म्हणून पुढे आला आहे. भाजपने सर्वाधिक 87 सभापतिपदांवर विजय संपादन केला; तर तीन जागा सहयोगी पक्षांना मिळाल्या. अशा एकूण 90 सभापतिपदांवर भाजपला यश मिळाले. 

उपसभापती निवडीत भाजपने स्वबळावर 87 जागी विजय संपादन केला; तर 6 उपसभापतिपदे भाजपच्या सहयोगी पक्षांना मिळाली. अशा एकूण 93 ठिकाणी भाजपने यश संपादन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली. त्यांना 66 सभापतिपदे मिळाली; तर उपसभापतिपदासाठी 65 जागी विजय संपादन केला. कॉंग्रेसचे 54 ठिकाणी सभापती निवडून आले; तर 48 ठिकाणी उपसभापती निवडून आले. शिवसेनेला 49 ठिकाणी सभापती; तर 53 ठिकाणी उपसभापती निवडूण आणता आले. विविध आघाड्यांच्या खात्यात 18 सभापती; तर 20 उपसभापतिपदे गेली. तीन सभापतिपदे आणि 4 उपसभापतींची पदे ही अपक्षांकडे आली. 

नुकत्याच झालेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 831 जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीला 674, कॉंग्रेसला 591 जागी; तर शिवसेनेला 581 जागी विजय संपादन करता आला होता. 

Web Title: BJP no 1

टॅग्स