

Controversy Erupts Over BJP’s Pick for Tuljapur Municipal Chief
Esakal
पालघर साधू हत्याकांड प्रकरणात ज्याच्यावर आरोप केले त्यालाच पक्षात घेतल्यानं विरोधकांच्या टीकेचा सामना भाजपला करावा लागला होता. शेवटी प्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय भाजपने घेतला. दरम्यान, आता तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या विनोद गंगणे यालाच भाजपने थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याचं समोर आलंय. आता या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. दुसीरकेड भाजपने तुळजापूर ड्रग्ज प्रकरण समोर आणण्यासाठी विनोद गंगणे याची मदत झाल्याचा दावा केलाय.