अजून एक दिवस थांबा सगळं कळेल : पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

उद्या 12 डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी उद्याच्या दिवशी स्वाभिमान दिवस असा नारा देत निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे.

बीड : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्त्यांशी उद्या संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाची गोपीनाथ गडावर जय्यत तयारी सुरु आहे. यावेळी पत्रकारांऩी पंकजा मुंडे यांना गाठून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली, मात्र यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, आजपर्यंत थांबला आहात तर आता अजून एक दिवस थांबून वा़ट पाहा, सर्व काही लवकरच समजेल. अशा प्रकारे मुंडे यांनी त्या काय निर्णय घेणार याबाबत काहीही सांगण्यास स्पष्ट नकार दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

दरम्यान, त्यांनी काय घोषणा करणार याबाबत अजूनच उत्सुकता ताणली आहे. हा कार्यक्रम राजकीय नसल्याचे त्यांनी सांगितले. मुंडे यांचे कार्यकर्ते मात्र त्यांनी वेगळा निर्णय घ्यावा असा आग्रह करत आहेत. त्यांच्या मते भाजपमध्ये पंकजा मुंडे यांची जाणीवपुर्वक कोंडी केली जात आहे.

महिला अत्याचारांत भाजप खासदार आघाडीवर

गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत स्वाभिमान दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. 12 डिसेंबर अर्थात उद्या होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे पंकजा मुंडेंच्या या मेळाव्यातून भाजप गायब असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. पंकजांच्या पोस्टर्सवर कुठेही भाजपचं कमळ चिन्ह नाही. मेळाव्याच्या ठिकाणी भाजपचे झेंडेही नाहीत. त्यामुळे पंकजांनी खरंच वेगळा मार्ग निवडला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उद्या 12 डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी उद्याच्या दिवशी स्वाभिमान दिवस असा नारा देत निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे. उद्याच्या कार्यक्रमानिमित्त लोकनेत्याला अभिवादन करणारे हजारो बॅनर्स शहरात लावण्यात आले आहेत. मात्र यातील एकाही बॅनरवर भाजपचे चिन्ह नाही. यामुळे तर्कवितर्क काढले जात आहेत.

आजारी असल्यामुळे पंकजा मुंडे भाजपच्या मराठवाडा विभागीय बैठकीला सोमवारी अनुपस्थित होत्या. त्यानंतर रात्री बारा वाजून सात मिनिटांनी ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी येत्या बारा तारखेला गोपीनाथ गडावर उपस्थित राहण्याचं आवाहन समर्थकांना केलं आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

’12 डिसेंबर ‘ रोजी सकाळी 11 वाजता आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना ‘गोपीनाथ गड’ येथे आमंत्रण. तुम्ही सारे या.. हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे आहे. तुम्ही ही या.. वाट पहाते’ असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. तसेच पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. येत्या 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर भेटू, अशी भावनिक साद कार्यकर्त्यांना घातली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bjp is not mentioned on the banner of pankaj mundes banner before gopinath munde jayanti program gopinath gad