'मनसेला जेवढा दाबायचा प्रयत्न कराल तेवढी ती उसळी घेईल': दरेकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pravin Darekar

'मनसेला जेवढा दाबायचा प्रयत्न कराल तेवढी ती उसळी घेईल': दरेकर

मुंबई : भोंग्याच्या प्रश्नावरुन वाद सुरु असून मनसेने दिलेल्या अल्टिमेटममुळे सध्या राज्याचं गृहखातं सतर्क झालं आहे. दरम्यान भाजपाचे प्रविण दरेकर यांनी या वादावर आणि चालू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

(Pravin Darekar On Shivsena)

औरंगाबादच्या सभेमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन आणि सभेत मोडलेल्या अटीमुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, भोंगे हा विषय आत्ताचा नसून राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करणे ही अतिरेकी कारवाई आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी सातत्याने हा विषय मांडला आहे आणि आत्ता सामाजिक विषय म्हणून समोर आला आहे. या देशात सर्वांना समान कायदा आहे, तो मुस्लिमांना वेगळा हिंदूंना वेगळा असा होत नाही. आज राज्यातील हिंदुत्ववादी जनता, समाज यांच्या स्वार्थी पणाला बघत आहेत असं ते बोलताना म्हणाले.

हेही वाचा: "शेवटचा एक दिवस बाकी... भोंगे बंद झालेच पाहिजे"; मनसेचा रिमाइंडर

राज ठाकरे हे स्वयंभू नेते आहेत, ते कुणाच्या सांगण्यावरुन बोलत नाहीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे तुम्ही पालन करणार नसेल आणि राज्यातील परिस्थिती बदलली तर यासाठी सरकार जबाबदार असेल असे ते म्हणाले. संजय राऊत यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, त्यांची वक्तव्य ही त्यांच्याच पक्षासाठी असावीत. त्यांच्या बोलण्याला कसलेच आधार नसतात. सरकारने एखादं आंदोलन चिरडायचे ठरवलं तर काय होऊ शकतं हे आपण पाहिलं आहे. सध्या राज्यात अघोषित आणिबाणी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा: "अल्टीमेटमवर देश चालत नाही..."

राज ठाकरे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याला ते भीक घालतील असं मला वाटंत नाही, तुम्ही जेवढं मनसेला दाबायचा प्रयत्न कराल तेवढी ते उसळी घेईल. सध्या मनसेवर राज ठाकरे यांच्या भडकाऊ भाषणामुळे कारवाई करत असल्याचं सरकार सांगतंय पण सूडाच्या भावनेतून ही कारवाई करत आहेत. राज्यातील सरकारंच कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच संघाने कायम हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे त्यामुळे आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही असं ते बोलताना म्हणाले.

Web Title: Bjp Pravin Darekar On Sanjay Raut Shivsena Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top