
"अल्टीमेटमवर देश चालत नाही..."
मुंबई : अल्टीमेटमवर देश चालत नाही असा टोला राऊतांनी राज ठाकरे यांना लावला आहे. सुपाऱ्या घेणाऱ्यांचा आणि देणाऱ्यांचा सरकारने शोध घेतला पाहिजे तसेच धमक्या देणाऱ्यांची ताकद नाही अशी अप्रत्यक्ष टीका राऊतांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर केलेली आहे.
"या राज्यातील गृहखातं आणि सरकार सक्षम आहे त्यामुळे कुणी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडत नाही. आज अक्षय्य तृतीया आहे, मुस्लिम बांधवांचा ईद आहे त्यांना त्यांचे सण आनंदाने साजरे करु द्या" असा टोला त्यांनी माध्यमांना बोलताना लावला आहे.
हेही वाचा: "शेवटचा एक दिवस बाकी... भोंगे बंद झालेच पाहिजे"; मनसेचा रिमाइंडर
भाजपाने त्यांच्या बूस्टर सभेत शिवसेनेवर तर औरंगाबादमधील त्यांच्या उपवस्त्र शरद पवारांवर तुटून पडले असं ते माध्यमांना बोलताना म्हणाले आहेत. भाजपाच्या उपवस्त्राला बूस्टर देण्याचं काम मुंबईत सुरु होतं पण खरंतर भाजपालाच बूस्टरची गरज आहे असं ते म्हणाले.
"फडणवीस हे मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढाच्यावर हातोडा मारत होते काय? देशांमध्ये वाद पेटवण्याचं काम सध्या सुरु आहे. चीननेही गलवान व्हॅलीत भोंगे लावलेत ते आधी उतरवा, तरंच तुम्ही हिंमतीचे" असा टोला त्यांनी लावला आहे.
हेही वाचा: मोदींनी दिलं जर्मनीच्या चान्सलरला अनोखं भारतीय बनावटीचं गिफ्ट
दरम्यान राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेमध्ये मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी पुन्हा अल्टिमेटम दिला आहे. ईदच्या नंतर मशिदीवर भोंगे दिसले तर आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवणार अशा इशारा त्यांनी औरंगाबादच्या सभेत दिला होता. त्यानंतर आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर राज्यभर महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पण ईदच्या सणामध्ये व्यत्यय नको म्हणून मनसेने महाआरतीचा कार्यक्रम रद्द केला आहे. त्यांच्या या भूमिकेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलत होते.
हेही वाचा: शरद पवारांना बदनाम करण्याचा राज ठाकरेंचा अजेंडा - हसन मुश्रीफ
या राज्यात फुले विरुद्ध टिळक यांच्याविरोधात वाद निर्माण करत असतील तर त्यांचे हे प्रयत्न फसलेले आहेत. समोर येऊन बोलण्याची त्यांची हिंमत नाही म्हणून ते कुणालातरी पुढे करत आहेत असा टोलाही त्यांनी भाजपाला लावला आहे.
Web Title: Sanjay Raut On Raj Thackeray Sabha Ultimatum Loudspeaker
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..