वाझे हा लादेन आहे का विचारायला अक्कल लागते; भाजपचा पलटवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

सत्तेत राहून मंत्रीपद भोगून त्याच कामांवर प्रश्न उपस्थित करायला अक्कल लागत नाही

वाझे हा लादेन आहे का विचारायला अक्कल लागते; भाजपचा पलटवार

मुंबई - काल (ता. १४) मुंबई महापालिकेत झालेल्या लोकापर्णाच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावला आहे. त्यांनी प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती. यावरून भाजपच्या एका आमदारांनी या टीकेवर पलटवारही केला आहे. दरम्यान, आता भाजप नेत्यांनी यासंबंधित पत्रकार परिषद घेऊन प्रतित्युर दिले आहेत. मुंबई येथे झालेल्या या पत्रकार परिषदेसाठी आज भाजपा आमदार अमित साठम, पालिका भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, स्थायी समिती सदस्या ज्योती शिरवाडकरही उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीसाठी शुभेच्छा. ते लवकरात लवकर बरे होऊन पून्हा सक्रिय व्हावेत ही इश्वरचरणी प्रार्थना आहे. तिळगुळ दिल्याशिवाय काम होत नाही असे काल मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे. त्यांनी जी टीका केली त्याला उत्तर देणं गरजेचं आहे. प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही असे विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. यावर भाजपा नेते म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मांडीला मांडी लावून बसण्याचं श्रेय घेण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी चोख बजावलं होतं. सत्तेत राहून मंत्रीपद भोगून आता त्याच कामांवर प्रश्न उपस्थित करताना अक्कल लागत नाही. सचिन वाजे हा ओसामबिन लादेन आहे का विचारायला अक्कल लागते, असा खोचक टोमणा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा: UP निवडणुकांसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, योगींचा मतदारसंघ ठरला

यशवंत जाधव यांच्या १५ कोटी मनीलाँड्रींग प्रकरणाची गोलमाल केली आहे. स्थायी समितीचा हा पैसा आहे. पोईसर नदीचा टेंडर अडीचशे कोटींवर नेण्यात आला. मिठी नदीच्या पॅकेजमध्ये म्हळसा आणि एका कंपनीला टेंडर मिळणार होते. इक्बाल सिंग, यशवंत जाधव हे महापालिकेतील सचिन वाझे आहेत. दरवर्षी किमान ६ हजार कोटींचे टेंडर पास होतात. सत्ताधाऱ्यांनी गेल्या २५ वर्षात दीड लाख हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचा गंभीर आरोप यावेळी भाजपाकडून करण्यात आला आहे.

महापालिकेचं कोविडमधील कामाचं कौतुक न्यूयार्कपासून इतरांनी केलं. मात्र कोविडने मृत्यू झालेल्या आकडेवारीत ३५ टक्के मृत लोकं ही महाराष्ट्रातील आहेत. या ठाकरे सरकारने पैसे खायची एकही संधी सोडलेली नाही. महालक्ष्मी कोविड सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केलं मात्र ते बंद केलं. यांच्या अशा कृतींमुळे अगामी महापालिका निवडणुकीत यांची सत्ता येणार नाही पराभव होईल, या भितीने हजारो कोटी लुटण्याचं काम सुरू आहे. या प्रकरणी आम्ही न्यायालयात दाद मागणारचं आहोत. पण जनतेच्या न्यायालयातही आम्ही हे पटवून सांगणार आहे.

यावेळी प्रभाकर शिंदे म्हणाले, आमचा कारभार हा अत्यंत उघड आहे. आम्ही लपवा छपवीकरत नाही. नियम, कायदे, परंपरा हे पायदळी तुडवून भ्रष्टाचार करण्यासाठी पालिकेत सत्ता येणार नाही. पराभव होईल या भितीने सध्या सत्ताधरी काम करत आहेत. मात्र तरीही दोन प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्षांनी कुणालाही विश्वासात न घेता पास केले आहेत. शिक्षणासाठी २००६ साली ६ हजारांना टॅब दिले होते. २०१० साली १० हजारांना दिले आता ते २० हजारांना दिले आहेत. २२५० कोटींच्या रस्त्यांचा प्रस्तावर कुणालाही विश्वासात न घेता पास केला आहे. आजही रस्त्यांच्या दर्जांवर प्रश्न उपस्थित केले जातात, मात्र कुठलही उत्तर दिलं जात नाही. मग ही लपवाछपवी कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: मोदी सरकारचा मोठा निर्णय; प्रजासत्ताक सोहळ्याची नवी तारीख जाहीर

पुढे ते म्हणाले, प्रस्तावांची माहिती ठराविक वेळेत देणं अपेक्षित असताना वर्ष वर्ष त्यावर उत्तर दिलं जातं नाही. पोईसर नदीचा प्रस्तावर ५०० कोटींचा होता ती किंमत दुप्पट होऊन ११०० कोटी झाली. पूर्वीच्या कामाचा आढावा न घेता कंत्राटदाराला कोणत्या अनुभवावर कंत्राट दिलं गेलं, हे स्पष्ट करा. यावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितला असतानाही यावर वेळ दिला नाही. मु़ंबईकरांची ही फसवणुक होत आहे. याबाबत आम्ही सर्वांना पत्रव्यवहार केला, मात्र कुणीही उत्तर दिलं नाही. पालिकेतला सर्व कारभार हा पायदळी तुडवला जात आहे. मुख्यमंत्री लपवा छपवी कसली हा प्रश्न करतात मग त्याचे नेते हे काय करतात? चर्चा न करता देता प्रस्ताव पास होत आहेत, ही घाई कशासाठी? असे सवाल यावेळी विचारण्यात आले आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top