

mp Ramrao Wadkute Death News heart attack delhi
esakal
Ramrao Wadkute Passes Away : भाजपचे राज्यसभा खासदार आणि मराठवाड्यातील धनगर समाजाचे प्रमुख नेते रामराव सखाराम वडकुते यांचे रविवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचार सुरू असताना वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अवघ्या सात महिन्यांपूर्वीच त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती. त्यांच्या निधनाने भाजपसह मराठवाड्यातील ओबीसी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.